नांदेडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

SHARE:

नांदेड – शहरात वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने सिडको येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये शुक्रवारी आत्महत्या केली. आकांक्षा गायकवाड असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती हडको येथील महाविद्यालयात होमिओपॅथी महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत होती. या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतत ॲट्रॉसिटीचे कलमही लावण्यात आले आहे. यामुळे जीनव घोगरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नांदेडमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षे विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केली. या प्रकरणी शुक्रावारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला होता. या विद्यार्थिनीची वसतीगृहाची आठ महिन्यापासूनची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मानसिक त्रास दिला होता.

या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यानुसार ग्रामीण पोलिसानी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
जीवन घोगरे यांच्या वसतिगृहामध्ये आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थिनी राहत होती, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. त्यामुळेच, माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार आकांशाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केली आहे.

त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

आकांक्षा गायकवाड ही हिडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात बीएचएमएस द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आई वडील मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे सरचिटणीस, माजी विरोधी पक्ष नेते जीवन घोगरे पाटील यांचं निवास आहे. त्यांनी त्यांच्या इमारतीत कॉट बेसेसवर केलेला हा वसतिगृह आहे.

मागील दोन वर्षांपासून मृत आकांक्षा ही कॉटबेसेसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबियांनी वसतिगृह चालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप केले.

गेली आठ महिन्यांपासून शुल्क थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती, याच त्रासाला कंटाळून पीडितेनं गळफास घेत जीवन संपवलं. दरम्यान, जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा