सुरत : स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये २ तरुणींसोबत असं घडलं तरी काय? अशा अवस्थेत आढळले मृतदेह…. दोघांनी एकत्र का संपवलं स्वतःचं आयुष्य… कॉलेजमधून येताना नक्की झालं तरी काय?
स्वामीनारायण मंदिराच्या बाथरुममध्ये तरुणींचा नको त्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना सुरत येथील डिंडोली येथील स्वामीनारायण मंदिर परिसरातील बाथरुममध्ये दोन तरुणींचे मृतदेह आढळले आहे… मिळालेल्या माहितीनुसार, डिंडोली येथील रामी पार्क सोसायटीत राहणाऱ्या रोशनी सिरसाथ आणि ज्योत्सना चौधरी लहानपणीपासून मैत्रिणी होत्या. दोघी कॉलेजमध्ये गेल्या पण परत न आल्यामुळे तरुणींच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं… त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. अखेर पोलिसांना तरुणींचे मृतदेह आढळले.. चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. मुलींनी चॅट जीपीटीला विचारुन आत्महत्या केली… आत्महत्या कशी करायची… याबद्दल मुलींनी चॅट जीपीटीला विचरलं होतं…
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघी एकत्र कॉलेजमध्ये जायच्या… पण वेळ उलटून गेल्यानंतर देखील दोघी घरी आल्या नाहीत. त्यामुळे कुटुबियांनी तरुणींना फोन केले. पण फोन त्यांनी उचलला नाही… अखेर कुटुंबियांनी पोलिसांना सर्वकाही सांगितलं… अशात घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिसांनी मोबाईल सर्वेलेंसच्या मदतीने दोन्ही तरुणींचं लोकेशन ट्रॅक केलं आणि दोन्ही तरुणींचं लोकेशन सानिया काणदे येथील स्वामीनारायण मंदिरात आढळले. पोलीस आणि कुटुंबातील सदस्य मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना महिलांची मोपेड आढळली, परंतु दोन्ही तरुणी बेपत्ता होत्या. त्यानंतर, पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा त्यांना दोन्ही तरुणी बाथरूममध्ये प्रवेश करताना दिसल्या. त्यांना बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना बाथरूममध्ये दोन्ही तरुणींचे मृतदेह आढळले.
दोन्ही मुलींच्या मृतदेहाजवळ एक भरलेली क्लोरोफॉर्म बाटली आणि एक रिकामी बाटली आणि इंजेक्शन सिरिंज देखील आढळली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. क्लोरोफॉर्मची बाटली आणि इंजेक्शनची सिरिंज देखील तपासणीसाठी एफएसएलमध्ये पाठवण्यात आली आहे. रिपोर्ट आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल माहिती समोर येईल…
संबंधित प्रकरणी काय म्हणाले पोलीस?
सुरतचे एसीपी नीरव सिंह गोहिल म्हणाले की, प्राथमिक तपासात दोन्ही मुली लहानपणापासूनच्या मैत्रिणी असल्याचे समोर आलं आहे. दोघी एकत्र कायम बाईकने कॉलेजला जायच्या… दोघींच्या मृतदेहा भोवती एनेस्थिटियाची भरलेली आणि एक रिकामी बाटली आढळली आहे…
दोघांच्याही मोबाईल फोनच्या प्राथमिक तपासणीदरम्यान, आम्हाला त्यांच्या चॅट जीपीटी आणि गॅलरीमध्ये फोटो सापडले. त्यांनी आत्महत्या कशी करावी, कोणते विष वापरावे आणि ते कसे घ्यावे याबद्दल माहिती देखील शोधली होती. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.




