उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीला अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार

SHARE:

नैनिताल – उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीला अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ट्रीपवर गेलेल्या एका तरुणीसोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. तिला रात्रभर जखमी अवस्थेत एका घनदाट जंगलात लपून बसावे लागले आहे. फिरायला गेलेली तरुणी रात्रभर जखमी अवस्थेत जंगलात लपून राहीली आहे. उत्तराखंडमधील नैनितालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. ती एकटीच पर्यटनासाठी नैनितालला गेली होती. मात्र हा निर्णय तिला आयुष्यभरासाठी जखम देणारा ठरला आहे.

तिला एका टॅक्सीचालकाने दगा दिल्याने तिला अशाप्रकारे जंगलात लपून बसावे लागले आहे. सकाळी उजेड होताच तिने स्वतःची सुटका करून घेतली. मात्र या घटनेने उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही दिल्लीची रहिवासी आहे. ती नैनितालला ट्रीपला गेली होती. डेहराडूनमार्गे ती काठगोदाम येथे पोहोचली. तिथून नैनितालला जाण्यासाठी तिने एक टॅक्सी भाड्याने घेतली होती. प्रवासात चालक दीपक सिंह बोरा याने टॅक्सी मुख्य रस्त्यावरून हटवून पटवा डांगर येथील एका अंधाऱ्या रस्त्याकडे वळवली.

रस्ता बदलल्याचे लक्षात येताच तरुणीने चालकाला जाब विचारला. यावर चालकाने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. टॅक्सी चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने धाडस दाखवत चालत्या टॅक्सीतून उडी घेतली. जवळच असलेल्या घनदाट जंगलात धाव घेतली. रात्रभर ती जखमी अवस्थेत जंगलात लपून बसली होती. मोबाईल नसल्यामुळे तिला कोणाशीही संपर्कही साधता आला नाही.

शुक्रवारी सकाळी पटवा डांगर गावात गेली. आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नैनिताल पोलिसांनी तपास केला. सीसीटीव्ही फुटेज, टॅक्सीचा क्रमांक आणि जीपीएस ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी 39 वर्षीय आरोपी दीपक सिंह बोरा याला अटक केली आहे. चौकशी केली असता तो आरोपी दुसऱ्याची टॅक्सी चालवत असल्याचे क्ळाले आहे.

उत्तराखंड पोलिसांकडून पीडितेचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरात फिरणार्या महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा