
बारमती – पुणे, मुंबईत दूध डेअरीवाल्यांची १० कोटींची फसवणुक करण्यात आली आहे, या प्रकरणात बारामतीत ईडीने धाड टाकली आहे. बारामतीमध्ये ईडीची धाड सुरू केली आहे. पुणे, मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांसह मंत्रालयातल्या कर्मचारी व अधिकारी लोकांनाही फसवल्याचा आरोप आहे. बारामतीमध्ये आज सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती आहे. बारामती तालुक्यातील जळोची या लोखंडेंच्या मूळ गावात ईडीची छापेमारी सुरू आहे. पुणे, मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांना 10 कोटींना फसवल्याच्या प्रकरणात ईडीने छापेमारी केली आहे. मंत्रालयातल्या काही कर्मचाऱी व अधिकारी यांनाही फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बारामती डेअरी प्रायव्हेड लिमीटेडच्या तक्रारीनंतर, आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आनंद लोखंडे आणि विद्या लोखंडे यांनी बारामती तालुक्यात अनेकांना फसवले असल्याची माहिती आहे. मुंबईच्या कंपनीकडून २ कोटींचे बटर, ९३ लाखांचे दूध खरेदी करून हप्ते बुडवले असल्याचेही समोर आले आहे. पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १० कोटी रुपयांहून अधिक रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या घोटाळयात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱी व कर्मचारी यांचाही सहभाग असल्याचे मोठे प्रकरण आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने आज बारामतीमध्ये छापे टाकले आहेत.
बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने बारामती तालुक्यातील जळोची येथील रहिवासी आनंद सतीश लोखंडे 28 आणि विद्या सतीश लोखंडे २४ यांच्याविरुद्ध १०,२१,५९,३६७ रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. लोखंडे दाम्पत्यावर पुणे आणि मुंबईतील इतर लोकांनाही अशाच प्रकारे फसवल्याचा आरोप आहे. या जोडप्याने तरुण उद्योजक असल्याचे भासवून एका प्रभावशाली राजकीय नेत्याचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. बारामती तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात अनेक कंपन्या उघडल्याचा आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप आहे.
बारामतीतील या व्यक्तींनी बारामतीच्या नेत्यांचे नाव घेऊन कशा प्रकारे फसवणूक केली, हे उघड झाले आहे. त्यांनी मुंबईतील एका कंपनीकडून २ कोटी रुपयांचे लोणी खरेदी केले आणि आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले, परंतु कधीही पैसे दिले नाहीत. दूध पुरवठ्याच्या नावाखाली या कंपनीकडून ९३ लाख रुपये घेण्यात आले, परंतु पुरवठा झाला नाही. दूध व्यापाऱयांना लाभ देण्याच्या नावाखाली ६.४३ कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली, परंतु निधीचा गैरवापर करण्यात आला. इतर अनेक व्यवहारांमध्ये चेक देण्यात आले, जे बाउन्स झाले. बारामती दाम्पत्याने मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱयांना गुंतवणूकीचे आमिष दाखवले, ज्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. बारामती तालुक्यात नेत्यांची नावे सांगुन मोठी आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार आता उघड झाला आहे, याप्रकरणात बारामतीत ईडीने धाड टाकली आहे.





