नाशिकचे मंत्री गिरीश महाजन यांना, लक्षात ठेवा व राजकारणातून फेकून द्या – अंजली दमानिया

SHARE:

नाशिक – नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना, लक्षात ठेवा व राजकारणातून फेकून द्या असे राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. नाशिक महापालिकेने चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी १२७०  झाडे तोडली आहेत. तर १७,६८० रोपांची लागवड करण्यात आल्याचा दावा नाशिकमधील मनपाने केला आहे. राज्यातील भाजपा सरकारचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना खुप मस्ती आली आहे, त्यांना राजकारणातून फेकून द्या , असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. नाशिक मनपाने वृक्षतोड केल्यावर अंजली दमानिया संतापल्या आहेत. यावरून अंजली दमानिया यांनी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टिका केली आहे.
नाशिक जिह्यातील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राज्यभरातून विरोध होत असतानाच, नाशिक महापालिकेने चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी तब्बल १२७०  झाडे तोडल्याच, स्पष्टीकरण दिले आहे. यावर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत, राज्यातील नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टिका केली आहे, व राज्यातील भाजपा सरकारवर चुकीच्या निर्णयामूळे ही टीका केली आहे. राज्यातील भाजपा सरकार झाड लावण्याची कामे करत नाहीत, तर राज्यातील झाडे तोडण्यात आघाडीवर आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, राज्यात वृक्षतोडीला एवढा विरोध होत आहे तरी, मंत्री गिरीश महाजनांना एवढी मस्ती आली आहे की, त्यांनी नाशिकची १२७०  झाडे तोडली आहेत. राज्यात लोकांनी झाडे तोडू नका म्हणून कितीही आंदोलने करा, आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार असे राज्यातील भाजपा सरकार आहे. आणि राज्यातील भाजपा सरकारचा सगळीकडे मनमानीपणे कारभार चालला आहे ,असेच सध्या आपल्या राज्यात दिसत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.राज्यातील भाजपा सरकारचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना राज्यातील व नाशिकमधील लोकांनी ही लक्षात ठेवा, आणि या भाजपा सरकारच्या मंत्री गिरीश महाजन यांना राजकारणातून फेकून द्या, असे म्हणत राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या यांनी संताप व्यक्त केला आहे, व राज्यातील भाजपा सरकारचा मनमानी कारभार राज्यात सुरू आहे, असे म्हटले आहे.
राज्यातील १२७०  झाडे तोडल्यानंतर नाशिक महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. नाशिक महापालिकेच्या पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी एकूण १७२८  झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यापैकी ४५८  झाडे वाचवण्यात आली आहेत. उर्वरित १२७०  झाडे तोडण्यात आली आहेत. वृक्षतोडीच्या बदल्यात महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून १  कोटी ७६  लाख रुपये भरपाई म्हणून स्वीकारण्यात आली आहे. या निधीचा वापर पर्यावरणीय भरपाई प्रकल्पांसाठी होणार आहे. त्याचबरोबर नाशिकमधील फाशीच्या डोंगराजवळ १७,६८०  नव्या झाडांची लागवड करण्यात आली असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचे, स्पष्टीकरण नाशिक महापालिकेने दिले आहे.
नाशिकमध्ये अजुनही वृक्षतोड थांबलेली नाही ,तर अजुन नाशिकमध्ये १५  हजार वृक्षांची लागवड होणार आहे, असे नाशिक महानगरपालिकेने सांगितले आहे. नाशिक जिल्हयातील तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱया 1800 वृक्षतोडीबद्दल नाशिक शहरांत व ग्रामीण भागातून नाशिकच्या तपोवन मधील १८०० वृक्षतोडीला तीव्र विरोध सुरू आहे. तरीही राज्यात व नाशिक जिल्हयातही झाडे तोडायला, पर्यावरणप्रेमी नागरिक व राज्यातील खाजगी संस्था यांचा मोठया प्रमाणावर विरोध सुरू असताना, ही राज्यातील भाजपा सरकारने पहिल्यांदा झाडे तोडली आहेत. आणि आता नाशिक शहरात वृक्ष लागवड करण्याचा दावा करत आहेत ,असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. आता नाशिक मधील महानगर पालिकेने झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आता वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत राजमुद्री येथून आणलेली झाडे, आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झाला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देत झाडांची निवड केली. सुमारे १५  फूट उंचीची १५ हजार देशी झाडे वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा आदींचा समावेश आहे. ठिबक सिंचन प्रणालीसह जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाकडून झाडांच्या देखभालीची व्यवस्था केली जाणार आहे. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षलागवड मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे, असे नाशिकमधील प्रशासनाने सांगितले आहे.
तर या नाशिकमधील मनपाच्या वृक्ष लागवड प्रकरणावरून राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, राज्यातील भाजपा सरकार आधी नाशिक जिल्हयातील झाडे तोडत आहेत , आणि त्यांवर परत वृक्ष लागवड करणार ही मोहिम जनतेला दाखवत आहेत. हे राज्यातील भाजपा सरकार नाशिकमधील पर्यावरणप्रेमी व नाशिकमधील लोकांना फसवणुक करित आहेत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या नाशिकमधील तपोवनमधील १८००  वृक्षतोडीच्या संदर्भात मीही राज्यातील काही राजकीय नेत्यांची भेट घेणार आहे, आणि नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात माझी स्पष्ट भूमिका मांडणार आहे, व राज्यातील भाजपा सरकारविरोधात पुढे आंदोलन करणार आहे का नाही? याची पुढची भुमिका ठरवणार आहे, असे राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा