
अमरावती – महानगरपालिका निवडणुकीचे वारे सर्वत्र पसरत असतांना प्रत्येक पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. प्रत्येक पक्षाने आपली उमेदवार चाचपनी सुरु केली असून प्रभाग वार बैठका आणि मेळावे घेतले जात आहे. भारतीय जनता पार्टी संत गाडगे बाबा मंडळ अमरावती च्या वतीने सुद्धा पदाधिकारी बैठक आयोजित केली होती. शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ अध्यक्ष अभिजित उर्फ छोटू वानखडे यांच्या नेतृत्वात नवसारी प्रभाग निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीला राज्याचे नेते सिद्धार्थ वानखडे व शहर सरचिटणीस बादल कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सिद्धार्थ वानखडे व बादल कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या. चंदा बारसे, ऋषिकेश देशमुख, वैभव बघणे, श्याम पाध्ये, संगीता तोंडे, रिता मोकलकर, जयश्री कुबडे, योगिता बोंडे, प्रकाश अटाळकर, प्रदीप कुलकर्णी, सचिन खंडारे, अश्विन राऊत, संजीव कटलकर यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. बैठकीला यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष अभिजित उर्फ छोटू वानखडे, महिला अध्यक्ष माधुरी दारोकर, मंडळ महामंत्री अमोल आगरकर, आकाश दानखडे यांनी अथक परिश्रम घेतले.





