रेकॉर्ड तुटला, इतिहास रचला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या टीमने दक्षिण आफ्रिकेचा फडशा पाडला, पाकिस्तानचा १९ वर्षांचा विश्वविक्रम पुसला…

SHARE:

दक्षिण अफ्रिका – भारताचा अवघ्या १४  वर्षांचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने २०२६  वर्षांच्या सुरुवातीलाच मोठी कामगिरी करून दाखवली आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडूचा तब्बल १९  वर्ष जुना विक्रम मोडीत काढत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या अंडर-१९  संघांमधील पहिला यूथ वनडे सामना आज विलोमूर पार्क येथे खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार वैभव सूर्यवंशीला फलंदाज म्हणून विशेष चमक दाखवता आली नाही आणि तो ११ धावांवर बाद झाला. मात्र सामना सुरू होताच वैभवने इतिहास रचला.

वैभव सूर्यवंशी हा आता यूथ वनडे क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याने १४  वर्षे आणि २८२ दिवस या वयात संघाचे नेतृत्व करत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या अहमद शहजाद याच्या नावावर होता. शहजादने २००७  साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५  वर्षांच्या वयात पाकिस्तान अंडर-१९  संघाचे कर्णधारपद भूषवले होते. वैभव सूर्यवंशी हा आता आंतरराष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये १६ वर्षांखाली कर्णधारपद भूषवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

दरम्यान, भारत अंडर-१९ आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९  संघांमधील दुसरा सामना 5 जानेवारी, तर तिसरा आणि अंतिम सामना ७  जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली असून आता भारताची नजर ही मालिका आपल्या नावावर करण्यावर आहे.

Leave a Comment