
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एशेज कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात जो रूटने झंझावाती शतक ठोकलं. या शतकासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावले. सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले. जो रूटचे शतक कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १४६ चेंडूत आले. त्याने २४२ चेंडूत १५ चौकार मारत १६० धावांची खेळी केली.
एशेज मालिकेतील शेवटच्या कसोटीत जो रूटचे शतक खास आहे. हे शतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.सिडनीमध्ये रूटचे शतक हे त्याचे ४१ वे कसोटी शतक होते. यासह रिकी पॉन्टिंगच्या ४१ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूट १०३ चेंडूत ७२ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने पुढे खेळत शतक ठोकले. सिडनी कसोटीतील हे त्याचे पहिले शतक आणि ऑस्ट्रेलियातील दुसरे कसोटी शतक आहे. या मालिकेपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी शतक झळकावले नव्हते.
गेल्या सहा वर्षांत जो रूटचे २४ वे कसोटी शतक आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने १७ पैकी ११ वेळा त्याच्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले आहे. २०२६ मध्ये जो रूटचे हे पहिले शतक आहे. कसोटी शतकांमध्ये रूट आता सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस यांच्या मागे आहे.
जो रूटने २०२५ मध्ये चार कसोटी शतके केली होती. २०२४ मध्ये जो रूटने सहा शतके केली होती. २०२३ मध्ये त्याने दोन कसोटी शतके, तर २०२२ मध्ये त्याने पाच कसोटी शतके आणि २०२१ मध्ये जो रूटने सहा शतके केली होती.





