नवी मुंबईमध्ये प्रभाग १७ मधील निवडणुकीला, उच्च न्यायालयाकडून स्थगिती; आज पुन्हा सुनावणी होणार…

SHARE:

नवी मुंबई – मुंबईमध्ये प्रभाग क्र. १७  मधील निवडणुकीला, उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती, आज पुन्हा सुनावणी होणार आहे. नवी मुंबईतील प्रभाग १७ मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक १७ अ मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले होते.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे प्रचार सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षातील बडे नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत. त्यातच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात जवळपास ७०  उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली होती. यासंदर्भात विरोधी पक्षातील काही नेते न्यायालयात गेले आहेत. त्यातच, आता नवी मुंबईत प्रभाग क्रमांक १७  अ च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे, आता येथील प्रभागात १५  जानेवारीला मतदान होणार का नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक १७  अ मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. भाजपचे उमेदवार निलेश भोजने याचा अर्ज बाद करण्यात आला होता. कारण, निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यासंदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, याप्रकरणी न्यायालयाने येथील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली असून, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज फेटाळला होता, आयोगाच्या या आदेशावर अंतरिम स्थगिती देत, मुंबई हायकोर्टाने निवडणुकीलाही अंतरिम स्थगिती दिली आहे. भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम १०(१) ड अंतर्गत भोजनेंचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने, अधिकारांचा वापर केल्याचे निरीक्षण केले आहे. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईत भाजपच्या उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने, प्रभाग १७  अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील संघर्ष वाढला आहे. दर्शन भोईर यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांविरोधात लढत आहे. दर्शन भोईर यांनी भाजपातील पक्ष प्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या घडामोडीमुळे प्रभाग १७  अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, आता न्यायालायाची पुन्हा आज सुनावणी होणार असल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुंबई महापालिकेत ११७  अर्ज बाद ठरले आहेत. मुंबई महानगरपालिका निडणुकीसाठी सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची, छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून, ८३९  अर्ज वैध तर ११७  अर्ज बाद ठरले. एकूण ९५६  नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. नेरूळ विभागात सर्वाधिक २८  अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल ३९ अर्ज बाद झाले आहेत. याच्या तुलनेत मुंबईतील वाशी विभागात, काटेकोर तयारी व कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे, एक अर्ज बाद झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा