अधिवेशाची परवानगी रद्द, भारत मुक्ती मोर्चाचा आंदोलनाचा एल्गार, २२ फेबु्रवारीला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा

SHARE:

नवी दिल्ली – ओडीशा राज्यातील कटक येथे होणार्या ५  दिवसीय संयुक्त राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्यानंतर भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने आंदोलनाची घोषणा केली आहे. संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, हक्क अधिकार वाचवा या कार्यक्रमांतर्गत चार टप्प्यात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा ७ जानेवारी रोजी पार पडला असून राष्ट्रपतींना जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे चार टप्पे पार पडल्यानंतर २२ फेबु्रवारी २०२६ रोजी अनेक संघटनांचा मोर्चा नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयावर धडकणार आहे..

चार टप्प्यांच्या आंदोलनांच्या तयारीअंतर्गत भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चा तसेच विविध संघटनांचे, तसेच सहयोगी संघटनांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहेत. २२ फेबु्रवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय पेन्शनर्स संघ, राष्ट्रीय मूस्लीम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेसह देशभरातील अनेक संघटनांच्या कार्यकत्यांच्या लाखोंच्या संख्येने नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

२६ ते ३० डिसेंबर या दरम्यान ओडिसा राज्यातील कटक येथे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांचे ५  दिवसिय संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाची तयारी २ ते ३  महिन्यांपासून सुरू होती. या अधिवेशनासाठी रीतसर परमिशन मंजुर झालेल्या होत्या. परंतु तेथील भाजपा सरकारने प्रशासनाला हाताशी धरून परमिशन रद्द केल्यात. हे भारतीय संविधानातील अनुच्छेद १९  चे सररास उल्लंघन आहे. असा आंदोनकर्त्यांचा आरोप आहे. या आधिवेशनात ओबीसींची जातीय जनगणना या विषयांवर गंभीर चर्चा होणार होती. हे अधिवेशनच ओबीसी जातीय जनगणना या विषयाला समर्पित होते.

या अधिवेशनात बहुजन समाजातील ज्वलंत समस्यांवर चर्चा होणार होती. परंतु आरएसएसप्रणित ब्राम्हणवादी भाजपा सरकारने प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा अधिवेशनाला परवानगी नाकारली. याविरोधात ४  टप्प्यांत राष्ट्रव्यापी जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली असून आंदोलनांचा पहिला टप्पा ७  जानेवारी रोजी पार पडला. पहिल्या टप्प्यात देशभरात राष्ट्रपतीना जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
शेवटचा टप्प्यात २२ जानेवारी रोजी देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली व प्रदर्शन करण्यात येणार आहे. यानंतर २२ फेबु्रवारी रोजी नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी संपुर्ण देशभरात जय्यत तयारी सुरू असून भारत मुक्ती मोर्चा व समविचारी संघटना, आणि अनेक सहयोगी संघटनाचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने नागपुरात धडकणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरएसएस विरोधातील या मोर्चासाठी देशातील ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी, कुणबी, मराठा, क्षत्रिय, राजपुत यासह सर्व बहुजन समाज एकवटला असून त्यांचे समर्थन मिळत आहे. इतकेच नाही तर नागपुरमध्ये या महामोर्चासाठी देशभरातील इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही नागपुरमध्ये मोठ्या संख्येने येणार आहेत, असा दावा भारत मुक्ती मोर्चा व त्यांच्या सहयोगी संघटनांनी केला आहे.
आज भारतात लोकशाही लागु आहे. भारतीय संविधान देशात लागू असताना बहुजन समाजाच्या हक्क व अधिकारांचे उल्लंघन होत आहे. बहुजन समाजाच्या हक्क व अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर आम्ही शांत राहणार नाही. आमच्या हक्क व अधिकारांसाठी लढण्याचा निर्धार आंदोलनकांनी व्यक्त केला. त्यांचे म्हणणे आहे कि संविधानाने आम्हाला विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र या अधिकाराचे भाजप सरकारकडून उल्लंघन केले जात आहे. म्हणून आम्ही याविरोधात नागपुर येथे २२ फेबु्रवारी २०२६ रोजी आरएसएसच्या मुख्यालयावर विशाल जनआक्रोश, मोर्चा काढणार असल्याचे भारत मूक्ती मोर्चा व त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा