अण्णामलाईने महाराष्ट्रातील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे, तर भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा सरकारला सवाल…

SHARE:

मुंबई – भाजप नेता अण्णामलाईने महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचा अपमान केला आहे, तर भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार आहेत का? असा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारला प्रश्न विचारला आहे. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही’; मुंबईत प्रचाराला आलेल्या भाजपच्या के अण्णामलाईने महाराष्ट्रातील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे, महाराष्ट्रातील मूबईत येऊन राज्यातील लोकांच्या विरोधात बोलला आहे. अण्णा, फण्णा, झण्णा कुणीही असो, त्याला अटक करा. भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का? अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्यात एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची, या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना, त्यात आता तामिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या नेत्याने, तेल ओतले आहे. मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत, हे शहर महाराष्ट्राचे नसल्याचे, वक्तव्य भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी केले आहे. मुंबईच्या व्यवस्थापनेसाठी योग्य लोक, बीएमसीमध्ये बसवावी लागतील असेही अण्णामलाई म्हणाले आहेत. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावरुन आता राज्यात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

के. अण्णामलाई हे तामिळनाडूतील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ,असून ते मुंबईत प्रचारासाठी आले आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. के अण्णामलाईल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत ,आणि मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे ७५ हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे ८  हजार कोटी, तर बंगळुरुचे बजेट हे १९  हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावे लागतील.

तामिळनाडूचा अण्णा की झण्णा, त्याला अटक करा , असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर, आता राज्यभरातून भाजपावर टीका होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “भाजपाच्या या अण्णामलाईवर भाजपा सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला आहे, तर राज्यातील भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार आहेत का?“असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “या भाजपाच्या अण्णामलाईने राज्यातील १०६  हुतात्म्यांचा अपमान केला आहे. त्याच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे व भाजपा यांच्या पक्षाचे काय म्हणणे आहे? फडणवीस म्हणतात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. मग तुमचे नेते असे म्हणतात, आणि भाजपाचे स्टार प्रचारक अशी वादग्रस्त वक्तव्य करतात.

तामिळनाडूचा अण्णा, फण्णा, झण्णा कुणीही असो, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला महाराष्ट्राबाहेर जाता आलं नाही पाहिजे.“असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारला इशारा दिला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांमूळे राजकीय वातावरण तापले आहे, व राज्यात काही ठिकाणी राजकीय पक्षांचे नेते ही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, राज्यात काही ठिकाणी , महापालिका निवडणूकांच्या निमित्ताने गुन्हेगारी व हाणामारीच्या घटना घडत आहेत, असे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा