ओडिशा – ओडिशामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे, तर या विमान दुर्घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. भारतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. ओडिशामध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले आहे. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत विमान क्रॅश झाले आहे.
भारतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. ओडिशामध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले आहे. भुवनेश्वरहून उड्डाण करणाऱ्या एका चार्टर्ड विमानाने, लँडिंगच्या काही काळापूर्वीच आपत्कालीन लँडिंग केले. या विमान दुर्घटनेत 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा या विमान दुर्घटनेची कसून चौकशी करत आहेत.
१० जानेवारी रोजी ओडिशातील राऊरकेला हवाई पट्ट्यावर एक मोठी दुर्घटना टळली, विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिकांसह ६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडिया वन एअरने चालवलेले, हे चार्टर्ड विमान भुवनेश्वर विमानतळावरून निघाले. विमान राऊरकेला विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, तांत्रिक बिघाडामुळे पायलटला आपत्कालीन क्रॅश लँडिंग करावे लागले. ९ आसनी असलेले चार्ली-२०८ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे.
या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. कॅप्टन नवीन कडंगा आणि सह-वैमानिक तरुण श्रीवास्तव अशी या विमानातील पायलटची नावे आहेत. जखमी प्रवाशांमध्ये सुशांत कुमार बिस्वाल, अनिता साहू, सुनील अग्रवाल आणि सबिता अग्रवाल यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भुवनेश्वर विमानतळ संचालक प्रसन्ना प्रधान यांनी, घटनेची माहिती दिली आहे. तर त्यांनी सांगितले की सर्व जखमी सुरक्षित आहेत, आणि कोणीही गंभीर नाही. त्यांनी पुढे सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंग केले, काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले, परंतु बचाव आणि मदत कार्य वेळेवर सुरू करण्यात आले. ओडिशाचे वाहतूक मंत्री बिभूती जेना यांनी, देखील या घटनेवर म्हणाले की, ते म्हणाले की हा एक मोठा अपघात असू शकतो, परंतु सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडले नाही. “विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सुरुवातीच्या तपासात, तांत्रिक किंवा यांत्रिक बिघाड असल्याचे दिसून येते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाणार आहे.
या घटनेनंतर, हवाई पट्टीवरील उड्डाणे काही काळासाठी विस्कळीत झाली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासन आणि विमान वाहतूक अधिकारी, घटनास्थळी पोहोचले आणि विमान सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड कसा झाला, आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, कोणती पावले उचलता येतील, याची चौकशी आता विमान वाहतूक सुरक्षा संस्था करतील. सध्या, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे , आणि एक मोठी हवाई आपत्ती टळली, याबद्दल प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.





