जालना – राज्यातील महापालिका निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रात, मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात माझा महायुती किंवा मविआला पाठिंबा नाही, मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे, तर मराठा समाजाला आवाहन करत म्हणाले, माझा कोणालाही पाठिंबा नाही, असे राज्यातील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी , त्यांची भूमिका जाहीर केली. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा दिला नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. माझ्या नावाने कोणी पत्रक प्रसिद्ध करत असेल त्यावर, कोणीही विश्वास ठेवू नये असे, जरांगे पाटील म्हणाले.
माझे जूने व्हिडिओ कोणी व्हायरल करत असतील, तर ते चूकीचे आहे. माझ्या नावाने कुणी पत्रके प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, जर कुणी स्थानिक पातळीवर पाठींबा दिला असेल तर, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल त्याचा, आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
आपण या निवडणुकीमध्ये मुंबईसह महाराष्टा्रमध्ये कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. पाठिंबाचे काही पत्रक प्रसिद्ध झाले असेल ,किंवा मुंबईमध्ये काही प्रकार झाले असतील, परंतु माझा कुणालाही पाठिंबा नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर, कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते लोक मराठा समाजाच्या लेकरांच्या मुळावर उठलेले आहेत, ते लक्षात घ्यावे. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. चळवळीत असलेल्या पोरांवर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.




