नवी दिल्ली – तामिळनाडूमध्ये मुली आणि मुले दोघांनाही शिक्षणाची समान संधी दिली जाते, त्यामूळे राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे, असे डीएमके खासदार दयानिधी मारन यांनी म्हटले आहे. दक्षिण भारतात मुलींना शिकवतात, दक्षिणेत मुलींना शिकवतात आणि उत्तर भारतात मुलींना शिक्षण घेण्यापासून अनेकदा परावृत्त केले जाते, असे डीएमके खासदार दयानिधी मारन म्हणाले आहेत.
डीएमके खासदार दयानिधी मारन यांनी दावा केला की, अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यापासून अनेकदा परावृत्त केले जाते आणि त्याऐवजी त्यांनी घरी राहून घरकाम करावे अशी अपेक्षा केली जाते. डीएमके खासदाराच्या या विधानाने नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे, असे भाजपाने म्हटले आहे. उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना नोकरीला न जाता घरातच ठेवतात, तर उत्तर भारतात ’इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन न दिल्याने संधी कमी होतात’ अशी स्थिती उत्तर भारतात आहे.
द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी, केवळ हिंदी भाषेचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि इंग्रजी शिक्षणाला दुय्यम स्थान देणाऱ्या राज्यांवर टीका केली आहे. अशा धोरणांमुळे रोजगाराच्या संधी कमी होतात आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थलांतर वाढते आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना मारन यांनी आरोप केला की, काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून परावृत्त केले जात आहे, आणि केवळ हिंदीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जात आहे. या कार्यक्रमात बोलताना द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी दावा केला की, उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मुलींना शिक्षण आणि करिअर करण्यापासून परावृत्त केले जाते, आणि त्यांच्याकडून घरी राहून घरकाम करण्याची अपेक्षा केली जाते, तर तामिळनाडूमध्ये महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले जाते. “आमच्या विद्यार्थिनींनी अभिमान बाळगावा. उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना नोकरीला न जाता, घरातच राहून घरकाम करण्यास सांगितले जाते, पण येथे तामिळनाडूमध्ये आम्हाला आमच्या मुलींनी शिकावे असे वाटते,” असे द्रमुकचे खासदार दयानिधी मारन म्हणाले.
तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास न करण्यास सांगितले जाते, आणि तसे केल्यास तुमचे नुकसान होईल, असे सांगितलं जाते, तुम्हाला गुलाम बनवून ठेवले जाईल,” असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानांमुळे हिंदीच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतातील लोकांचे दक्षिणेकडे होणारे स्थलांतर या शैक्षणिक पद्धतींमुळे होत असल्याचा दावा केला. तामिळनाडूने शिक्षणावर भर दिल्यानेच राज्याची आर्थिक वाढ झाली आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. “आज, सुशिक्षित लोकांमुळेच सर्व मोठ्या जागतिक कंपन्या तामिळनाडू राज्यात येत आहेत,“ असे ते म्हणाले.
त्यांनी दावा केला की, शिक्षणाला केवळ हिंदीपुरते मर्यादित ठेवल्याने इतर प्रदेशांमध्ये बेरोजगारी वाढते. तर तामिळनाडूचे द्रविड मॉडेल मुली आणि मुलं दोघांनाही शिक्षणाची समान संधी देते. यामुळे राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढले असून, महिलांचा कार्यशक्तीतील सहभागही वाढला असल्याचेही ते म्हणाले. मारन यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन न दिल्याने विद्यार्थ्यांच्या संधी आणि भविष्यातील शक्यता मर्यादित होतात, आणि भाषा-आधारित निर्बंध हे वाढ आणि रोजगाराच्या मार्गात अडथळे ठरतात. भाजपने दयानिधी मारन यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. भारतातील हिंदी भाषिक लोकांची माफी मागितली पाहिजे, ज्यांना त्यांनी अशिक्षित आणि असंस्कृत म्हणून चित्रित केले आहे,” असे भाजपा नेते तिरुपती नारायणन यांनी म्हटले आहे.




