बिश्नोई टोळी भारत सरकारसाठी काम करते, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या अहवालात खळबळजनक दावा

SHARE:

नवी दिल्ली – लॉरेन्स बिश्नोई टोळी ही भारत सरकारसाठी काम करते, असा खळबळजनक दावा रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) च्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे. ही टोळी भारत सरकारच्या वतीने काम करत आहे. या अहवालामुळे भारत-कॅनडा संबंधांबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे. व्हँकुव्हरस्थित मीडिया आउटलेट ग्लोबल न्यूजने हा अहवाल पाहिला आहे. हे आरोप अत्यंत गंभीर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

आरसीएमपी अहवाल तीन पानांचा आहे आणि सध्या तो गोपनीय गुप्तचर आढावा म्हणून वर्णन केला जात आहे. अहवालात लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि भारत सरकारमधील कथित संबंधांचा सहा वेळा उल्लेख आहे. अहवालानुसार, कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीची उपस्थिती सातत्याने वाढत आहे. अहवालात म्हटले आहे की ही एक हिंसक गुन्हेगारी संघटना आहे जी अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. कॅनडामध्ये तिचे जाळे वेगाने विस्तारत आहे आणि स्थानिक गुन्ह्यांमध्येही ती सहभागी आहे. अहवालानुसार, ही टोळी संघटित पद्धतीने गुन्हे करत आहे.

आरसीएमपीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे कि बिश्नोई टोळी भारत सरकारच्या वतीने काम करते. अहवालात असे म्हटले आहे की ही टोळी आपले गुन्हेगारी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करते. आरसीएमपीच्या मते, बिश्नोई टोळी खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, मनी लाँडरिंग आणि लक्ष्यित हत्या यासारख्या अनेक गंभीर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या टोळीचा प्राथमिक हेतू लोभ आणि आर्थिक फायदा आहे.
कॅनडातील बिश्नोई टोळीच्या वाढत्या उपस्थितीची माहिती देणारा हा गोपनीय दस्तऐवज कॅनडाच्या माहिती कायद्याअंतर्गत ग्लोबल न्यूजने मिळवला आहे. हा अहवाल अशावेळी समोर आला आहे, जेव्हा ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड ॲबे यांनी भारतात व्यापार मोहीम सुरू केली आहे. तसेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी देखील या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारत दौऱ्यावर येणार आहेत..

कॅनडाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी बिश्नोई टोळीबद्दल असे दावे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२४ मध्ये, कॅनेडियन पोलिसांनी आरोप केला होता की भारतीय सरकारी एजंट दक्षिण आशियाई डायस्पोराच्या सदस्यांवर माहितीसाठी दबाव आणण्यासाठी बिश्नोई टोळीसारख्या संघटित गुन्हेगारी गटांचा वापर करत आहेत. या अहवालात तारीख नसली तरी, त्यात जून २०२५ मध्ये बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी ॲबेने सरकारला केलेल्या विनंतीचा उल्लेख आहे.
गेल्या वर्षी कॅनडाने लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. त्यांनी बिश्नोई टोळीवर कॅनडामधील महत्त्वपूर्ण स्थलांतरित समुदायांच्या सदस्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. भारताने असे म्हटले कीआंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी ही दोन्ही देशांसाठी एक विशेष चिंता आहे“ आणि सर्व राष्ट्रांनी या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र आले पाहिज.

दरम्यान, कॅनडातील शिखांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे कारण देत भारतासोबत कॅनडाच्या अलिकडच्या राजनैतिक प्रयत्नांना विरोध केला आहे. कॅनडाच्या एका वृत्तसंस्थेने कॅनडाच्या वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते बलप्रीत सिंग यांना उद्धृत केले आहे की आरसीएमपी आणि कॅनेडियन सरकारला माहिती आहे की बिश्नोई टोळी कॅनडामधील व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी भारत सरकारसोबत सहकार्याने काम करत आहे. त्यांनी असा दावा केला की राजकीय सोयीसाठी हा मुद्दा कमी लेखला जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा