महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर, काँग्रेसमध्ये नाराजी ,राजकीय नेत्यांना नोटीस, राजीनाम्याची मागणी

SHARE:

मुंबई – महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे, तर राजकीय नेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, तर काही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षांकडून करण्यात आली आहे. राज्यात मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली आहे, तर वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे, तर भाई जगतापांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील महापालिका निवडणूक निकाल येण्यास २४ तास उलटण्याआधीच, भाई जगताप यांनी, जाहीरपणे गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काँग्रेसने भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाची ताकद म्हणून पुढे आला आहे. अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने काल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून लढवली. या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागांवर विजय मिळवता आला. पक्षाने या निराशाजनक कामगिरीचे खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडत त्यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी भाई जगताप यांनी केली होती. ७  दिवसांत लेखी खुलासा करावा, असे काँग्रेसचे सचिव आणि मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

ठाण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत , स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून, या निवडणुकीत काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण देखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी, शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तसेच राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा देखील केली आहे. पराभवानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा पराभव झाला आहे. मुंबई आणि पुण्यात काँग्रेसला केवळ ५-५  जागांवरच आघाडी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. ठाण्यात काँग्रेस फक्त २  जागांवर आघाडीवर आहे, मोठ्या शहरांत काँग्रेस पिछाडीवर आहे.

Leave a Comment

अधिक वाचा