मुंबई – लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी केली नव्हती त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक लाभार्थ्यांची ई केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ताही मिळू शकला नव्हता.
यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 20, 2026
तथापि, काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.





