महाराष्ट्रात मराठी व हिंदीबरोबर गुजराती भाषेतील वाहतूक बंदीच्या, भाजपा सरकारच्या अधिसूचनेमुळे नवीन वाद

SHARE:

पालघर – महाराष्ट्रात मराठी व हिंदी बरोबर गुजराती भाषेतील वाहतूक बंदीच्या, भाजपा सरकारच्या अधिसूचनेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यातील रस्त्यावरचा या प्रकाराने राज्यातील विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा सरकार राज्यात असल्यामूळे राज्यात नवीन वादाच्या घटना घडत आहेत, असे राज्यातील विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. पालघर हा जिल्हा नक्की गुजरात मध्ये आहे की, महाराष्ट्रात आहे, यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. नकाशात पालघर हा जिल्हा दोन्ही राज्यात दाखवत आहे. यामूळे पालघर हा जिल्हा महाराष्ट्रात की गुजरातमध्ये आहे, यावरून वाद निर्माण झाला आहे.

रस्त्यावर राज्यातील वाहतुक विभागाने गुजराती, मराठी, हिंदी भाषेत सुचना फलक लावल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या गुजराती, मराठी, हिंदी भाषेत सुचना फलक लावल्याच्या प्रकाराने राज्यातील विरोधी पक्ष राज्यातील भाजपा सरकारवर टीका करत आहे. पालघरचा हा नकाशात ही बदल दिसून येत आहे. पालघर जिल्हा निर्मितीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा, अशी ओळख आहे. पालघर जिल्हा महाराष्ट्रातच आहे की गुजरातमध्ये असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा असलेला, पालघर हा जिल्हा महाष्ट्रात आहे की, गुजरातमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी कारण ठरली आहे राज्यातील भाजपा सरकारची एक अधिसूचना. यावरुन राज्यातील विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यातील पालघर जिल्हा प्रशासनाने, १९ व २० जानेवारी २०२६  रोजी, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एनएच-४८  मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी, वाहतूक बंदीची अधिसूचना काढली आहे. मात्र या अधिसूचनेत मराठी व हिंदीबरोबर गुजराती भाषेचाही वापर करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकारवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राज्याची अधिकृत भाषा मराठी असताना, गुजरातीचा समावेश का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी, उपस्थित केला आहे. यावरून राज्यातील पालघर जिल्हा प्रशासनावर व राज्यातील भाजपा सरकारवर, विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

राज्यातील पाट्याही गुजरातीमध्ये दिसू लागल्या आहेत, यावरून विरोधी पक्ष संताप व्यक्त करत आहे. पालघर जिल्ह्यातील रस्त्यावर वाहतुकींच्या बदलासंदर्भात, लावण्यात आलेले फलक आणि सूचनाही गुजरातीमध्ये असल्याने, राज्यातील ना्ररिकांनी भाजपा सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री खरा पालघर जिल्ह्याचा नकाशा जाहीर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी, “हे प्रकरण गंभीर आहे. यावर महाराष्ट्रातील सर्वच विरोधी पक्षांनी, एकत्र बसून विचार केला पाहिजे. पालघर महाराष्ट्रात आहे की, बुलेट ट्रेन आणि वाढवणे, बंदराच्या निमित्ताने, हा बाजूच्या राज्याला जोडला गेला आहे,“ व “पालघरचा हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा,“ असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात बिहार भवनावरुन वाद उपस्थित झाला आहे. गुजराती भाषेवरील या वादाच्या एक दिवसआधीच, बिहार भवनावरुन नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. मुंबईत लवकरच ३० मजली ’बिहार भवन’ उभे राहणार आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. नितीश कुमार सरकारने यासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांचा, निधी मंजूर केला आहे. बिहारमध्ये सध्या, भाजप व नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे. नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला, हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र याला मुंबई आणि महाराष्ट्रातून, विरोध होताना दिसत आहे.

मनसेने हे बिहार भवन उभारण्यास विरोध केला असून, नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी, हे आम्ही काही बांधू देणार नाही. एवढे पैसे खर्च करुन त्यांनी, त्यांच्या राज्यात चांगली रुग्णालये सुरु करावीत, म्हणजे लोक इथे उपचारासाठी येणार नाहीत, असे म्हटले आहे. राज्यात गुजराती भाषा व बिहार भवन , रस्त्यावरील वाहतूक विभागाचे गूजराती व हिंदी भाषेतील अधिसुचनेतील फलक यांवरून नवीन वाद उपस्थित झाला आहे, आणि यावरून राज्यातील भाजपा सरकारवर, राज्यातील विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत टिका केली आहे. राज्यात भाजपा सरकारच्या काळात नवनवीन वाद उपस्थित होत आहे, असे राज्यातील विरोधी पक्ष म्हणत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा