राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ईव्हीएम विरोधात आंदोलन, झेडपीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी

SHARE:

मुंबई – लोकसभेत जोरदार फटका बसल्यानंतर मात्र विधानसभेसोबतच नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालं. या निवडणुकीत भाजपने अनेक महापालिकेत एका हाती सत्ता मिळवली. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यलयात घुसून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर घोषणा देणार्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांसह बामसेफ ही संघटना ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करत आलेली आहे आणि आजही करत आहे. त्यांचा आरोप आहे सरकार निवडणूक आयोगाच्या मदतीन ईव्हीएमध्ये फेरफार करत आहे. यामुळे त्यांनी अनेकदा बॅलेट पेपरवर निवडणुकी घेण्याची मागणी केली आहे. यासाठी बामसेफ या संघटनेचे आजही आंदोलन सुरूच आहे. यामुळे अनेक लोकांचा आता ईव्हिएमवर विश्वास राहिलेला नाही. असेच दिसून येत आहे.

दरम्यान छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन केले आणि ईव्हीएम हटाव देश बचाओ अशा घोषणा दिल्या. यामुळे आयोगाच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला. प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.

ईव्हीएमवर बंदी घालावी, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करुन निवडणूक जिंकत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी केला. तसेच, निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, असेही त्यांनी म्हटलं. ईव्हीएम हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. यानंतर पोलिसांनी प्रतिष्ठानच्या ४  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Leave a Comment

अधिक वाचा