ठाणे – ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे 4 नगरसेवक पाडले, असे एमआयएमच्या सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांना अहंकार होता, आम्ही हरणार असे त्यांना वाटायचे, असे सहर शेख म्हणाली. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी उमेदवारी देतो, असा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला. निष्ठावंतांना फसवणाऱ्या, अशा नेत्यांना मी जर आव्हान दिले नसते तर, मी जनतेला काय उत्तर दिले असते. तर ठाण्यातील मुंब्रामध्ये आव्हाडांनी, माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे ४ नगरसेवक पाडले आहेत, असे वक्तव्य, मुंब्राची नवनियुक्त एमआयएमची नगरसेविका सहर शेखने केले आहे.
एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे म्हणून, संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असे म्हटले होते. तो वेगळा रंग असता तर, तसे म्हटले असते ,असेही तीने स्पष्टीकरण दिले आहे. भविष्यात शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर ठाण्यातील मुंब्रामध्ये, काम करणार असल्याचे सहर शेखने म्हटले आहे. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रामध्ये, एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये सहर शेख ही तरुणी, जास्त मताधिक्याने निवडून आली आहे. त्यानंतर बोलताना, असे सहर शेख म्हणाली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाडांनी अचानक उमेदवारी देण्याचा शब्द फिरवला आहे.त्यामूळे एमआयएम मधून निवडणूक लढवावी लागली आहे. जितेंद्र आव्हाडांनी महापालिका निवडणुकीत, उमेदवारीचा शब्द देऊनही तो फिरवला. त्यामुळे त्यांना आव्हान देणे गरजेचे होते. तसं केले नसते तर मी जनतेला काय उत्तर दिले असते, असे सहर शेख म्हणाल्या आहेत. सहर शेख म्हणाली की, “शरद पवारांची राष्ट्रवादी ज्या दिवसापासून स्थापन झाली होती , त्या दिवसापासून माझे वडील ,राष्ट्रवादीचे मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती, त्यांचा तो अधिकार होता. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा दिला, आणि त्यांना जिंकवून आणले आहे.
जितेंद्र आव्हाडांनीच माझे नाव आधी जाहीर केले होते. आव्हाडांनी तसा अनेक लोकांसमोर, माझ्या वडिलांना शब्द दिला होता. पण नंतर त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळेच त्यांना जर आम्ही आव्हान दिले नसते तर, ते आमच्यासाठी चुकीचे, व येथील जनतेसाठी चुकीचे ठरले असते, व येथील जनतेला आम्ही काय उत्तर दिले असते, असे एमआयएमच्या सहर शेख म्हणाली आहे. सहर शेख म्हणाल्या की, “शेवटच्या दिवसापर्यंत मला तिकीट देणार असल्याचे ,जितेंद्र आव्हाड सांगत होते. त्यावेळी आम्ही सर्वात मोठी रॅली काढली, तरीही त्यांनी दिलेला शब्द फिरवला. हे असे नेते लोकांना शब्द देतात, त्याच्यामागचा त्यांचा हेतू समजवून घ्यावा लागेल.
शेवटच्या क्षणापर्यंत असे आपल्याला ताटकळत ठेवतात ,म्हणजे आपण इकडचे पण राहणार नाही, आणि तिकडचेही राहणार नाही. आम्हाला जर आधीच माहिती असते तर ,आमच्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी तयार होती. पण ते भाजपसोबत असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हटले होते. त्यामुळेच ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे ठरवले, असे सहर शेख म्हणाली आहे.
ज्यावेळी फॉर्म भरायले गेले त्यावेळी, आतमध्ये काँग्रेस आणि एमआयएमचे लोक ,समोर एबी फॉर्म घेऊन उभे होते. त्यावेळी एमआयएमची ऑफर आल्यानंतर, त्याचवेळी मी त्यांची ऑफर स्वीकारली, आणि एमआयएममधून लढून जिंकले आहे, असे सहर शेख म्हणाली आहे. इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर, संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे नगरसेवक निवडून आले असते, असे सहर शेख म्हणाली. ती म्हणाली की, तुतारीवाले उमेदवार एमआयएमच्या विरोधात, फक्त 200-300 मतांच्या फरकाने जिंकले आहेत. पण माझा विजय हा साडे पाच हजार मतांनी झाला आहे.
मी त्यावेळी इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर, संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे उमेदवार निवडून आले असते, असा माझा विश्वास आहे.“ प्रचार करताना माझ्या वडिलांना, सौम्य हृदयविकाराचा धक्का बसला होता. पण अशावेळीही मला बुद्धी दिली, ताकद दिली. स्वतंत्र लढले असते तर, मी निवडून आले असते, पण त्यासाठी अजून कष्ट करावे लागले असते. त्यामुळे एमआयएमची उमेदवारी घेतल्याचे सहर शेखने स्पष्ट केले आहे. कोणताही पक्ष धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांध नसते, तर तुमचा विचार तसा असतो. तुमचे विचार हे धर्मनिरपेक्ष असायला हवेत, मग पक्ष कोणताही असो असे सहर शेखने म्हटले आहे. कैसा हराया’ असं वक्तव्य करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यावर बोलताना सहर शेख म्हण…




