मुंबई – मुंबईमध्ये महापालिका सभागृहात ठाकरे गटाचे जास्त नगरसेवक असणे हेच सत्ताधाऱी भाजपाला आव्हान आहे, असे ठाकरेगट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी, एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल, व शिवसेना पक्ष ही राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, वारंवार पुढे ढकलली जात आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण, चिन्हाबाबत मोठे दावे केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी, सरन्यायाधीशांना वाकून पुष्पगुच्छ दिला आहे तरी, त्याचा फायदा होणार नाही. भारतीय संविधानातील १० व्या परिशिष्टानुसार, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. तर माझ्या हातात राज्याची आणि या देशातील विशिष्ट खात्यांची सत्ता द्या, मी ही भाजपचे तुकडे करुन दाखवतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
भारत देशात ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर, भाजपा राज्यकारभार करत आहे. भाजपाकडे राज्यात स्वतःचे कुठे काय आहे? त्यांच्या पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची लोक भरली आहेत. मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला आहे. मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर जास्त नगरसेवक, ठाकरे गटाचे असणे हेच सत्ताधाऱी भाजपाला आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस, ठाकऱे गटाच्या मागे आहे, हे दाखवून दिले आहे. भाजपाच्या जिथे परप्रांतीय बहुसंख्य आहे, तिथे जागा निवडून आल्या. तर जो मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे तो, ठाकरेगटाच्या मागे आहे, ,असे संजय राऊत म्हणाले आहेत.





