मुंबई – राज्यात शाळा आणि महाविद्यालयांत, ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. राज्यात महिलांचा उपयोग ड्रग्जच्या व्यापारासाठी होत आहे. महाराष्ट्रात ड्रग्ज प्रकरणात, मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात ड्रग्ज सेवन प्रकरणात ६,४८२ जणांवर कडक कारवाई केली आहे. या घटनांमध्ये तरुणाईचा, वाढता सहभाग चिंताजनक आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी काही ठिकाणी, ड्रग्ज मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांसोबतच, शिक्षकांना मार्गदर्शन दिले आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने, २०२५ या मागील वर्षामध्ये एका वर्षात, मोठी कडक कारवाई केली आहे. तर या प्रकरणात ८५७.१२ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत राज्यातील सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. एमडी ड्रग्जच्या वापराचे प्रमाण जास्त आहे. एकूण ६५० कोटी रुपयांच्या १३२७.१७ किलो एमडी ड्रग्जचा साठा मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे.
राज्यात ड्रग्जच्या सेवनाची समस्या, ही महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये वाढली आहे. आणि राज्यातील शाहा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये, याचा वापर अधिक वाढला आहे. मुंबई पोलिसांच्या मासहितीनूसार, ड्रग्जच्या वापरासाठी तरुण मुलांमध्ये आकर्षण निर्माण केले जात आहे. या चिंताजनक विषयावर व समस्यावर मात करण्यासाठी, मुंबई पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांसोबतच पालकांना, जागरूक करण्यासाठी ड्रग्ज मोहिमेचा अवलंब केला आहे. यामध्ये २० हजार विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना, ड्रग्ज विषयी मार्गदर्शन केले आहे.
राज्यात काही ठिकणी ड्रग्ज तस्करीसाठी, महिलांचा वापर वाढला आहे. महिलांचा वापर वाढल्यामुळे पोलिसांना, जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात महिलांद्वारे ड्रग्ज वाहतूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पोलिस प्रशासन सक्रिय झाले आहे. मागील वर्षभरात मुंबई पोलिसांनी, १,१४१ ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंदवले आहेत, तर १,४५४ तस्करांना अटक केली आहे. राज्यातील नाशिक, सोलापूर आणि अन्य ठिकाणी कडक कारवाई करण्यात आली आहे. अनेक केमिकल कारखान्यांमध्ये, ड्रग्ज तयार होत आहे. या कारखान्यांच्या आडून अंमली पदार्थ साम्राज्य उभे राहिले आहे. तर पोलीस प्रशासन आता तस्करीच्या नेटवर्कला, संपवण्यासाठी अधिक कडक कारवाई करत आहे.
मुंबई पोलिसांनी वर्षभरात हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा आणि कफ सिरप जप्त केले आहेत. हेरॉईनची किंमत ४७.९५ कोटी आहे. तर १२.८२ किलो हेरॉईन, चरस २३.३७ किलो, आणि कोकेन ११.१३ किलो जप्त करण्यात आले आहे. राज्यात दिवसेंदिवस अंमली पदार्थ सेवनाचे, प्रमाण वाढत चालले आहे, आणि राज्यातील काही ठिकाणी अंमली पदार्थाची, तस्करी ही वाढली आहे, असे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने माहिती दिली आहे.





