मुंबई – राज्यातील अनेक शहरात एमआयएम या पक्षात एससी, ओबीसी लोक निवडून आले आहेत, तर राज्यात एमआयएम पक्षाने इतर लोकांनाही तिकीट दिले आहे, राज्यातील जनता आमच्यासोबत आहे, असे एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकामध्ये एमआयएमने राज्यात १२५ हून अधिक जागांवर यश मिळवले आहे. मुंब्रा येथून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनाच एमआयएमने टक्कर दिली आहे. येथील सहर शेखसह ४ उमेदवार एमआयएमचे विजयी झाले आहेत. मात्र, सहर शेखच्या विजयानंतर तिने केलेल्या भाषणाचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सहर शेखच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच, तिच्या वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात एमआयएम पक्ष ही इतर पक्षासारखा राजकारणात आहे. कारण एमआयएम पक्ष ही संविधानाला मानून चालला आहे. भारत देशात जेव्हापासून, नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, तेव्हापासून हिंदू राष्ट्र करण्याचे, भाजपा सरकारचे प्रयत्न सुरू झाले. त्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी आहे. कारण, राज्यातील पा्रदेशिक पक्ष ही , फक्त सत्तेसाठीच हे एकत्र आले आहेत. एमआयएम हिरव्या रंगाची आहे, असे सगळे बोलत होते. मात्र, मुंबईत आमचे नगरसेवक निवडून आणले आहे, त्यांना आम्ही मुंबईची जबाबदारी दिली आहे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
राज्यातील अनेक शहरात आम्ही एससी, ओबीसी लोकांना निवडून आणले आहे. मुंब्रामध्ये जेव्हा हिरवा-भगवा करत होते तेव्हा मयूर सारंग यांना देखील आम्ही तिकीट दिले होते, ते देखील निवडून यायला पाहिजे होते. आम्ही हिंदू लोकांना देखील तिकीट दिले आहे, जनता आमच्यासोबत आहे. तसेच, माझ्या गाडीत भगवा, हिरवा, सगळे रंग आहेत. तुम्ही देशाला रंगात वाटले आहे का? कोणता रंग कोणत्या जातीसोबत हे तुम्ही जोडले आहे का? या रंगावरून त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत जलील यांनी मुंबईतील भाजपा नेते, नितेश राणे, नवनीत राणा, किरिट सोमैय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्यातील भाजपा नेत्यांचा व्हिडिओ दाखवला आहे, राज्यातील भाजपा सरकारचे, अनेक आमदार, खासदार, मुसलमानांच्या विरोधात बोलतात, तेव्हा राज्यातील भाजपा सरकार व मुंबई पोलिसांनी, त्यांच्यावर काय कारवाई केली? एक भाजपाचा नेता येतो, आणि तुम्ही इतका मोठा विवाद करता, त्यांनी आणले त्यापेक्षा जास्त माणसे मी आणू शकतो. तुमची राज्यात सत्ता आहे तर, कानून तुमच्यासारखे चालणार का? मी विचारतो की कोणत्या नियमाखाली, मुंबई पोलिसांनी त्या मुलीला नोटीस पाठवली? तिने जे स्टेटमेंट दिले त्यावरून आम्ही मागे हटणार नाही, ती जे बोलली त्याला आम्ही सपोर्ट करतो, अशी भूमिका देखील इम्तियाज जलील यांनी मांडली.
भाजपा नेते किरिट सोमय्या, तू त्या लहान मुलीवर कायदा लावला, आज मी बोललो तर माझ्याविरुद्ध तक्रार दे. आधी तुमचे चरित्र बघा, नंतर आरोप करा, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही, इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. मुंबईत इतक्या लोकांनी आम्हाला मतदान दिले आहे तर, आम्ही मुंब्य्राच्या विकासासाठी काम करणार आहोत. असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
मुंबईत एकनाथ शिंदे म्हणतात की, पूर्ण ठाणे भगवा आहे, तर ते चालते आणि मी म्हणालो की मुंब्रा हिरवा आहे तर, त्यात तुम्हाला प्रॉब्लेम आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगू नये, जर मी तोंड उघडले तर त्यांना देखील, खूप प्रॉब्लेम होईल. भाजपा सरकार त्यांना, कधी उचलून फेकेल याची त्यांनी चिंता करावी. राज्यातील संभाजीनगर इथे त्यांचे पालकमंत्री आहेत, त्यांचे ५ आमदार आहेत तरी, माझे ३३ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांचे किती आलेत? याची माहिती घ्या, असे म्हणत, एकनाथ शिंदेंवरही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, जोरदार टीका केली आहे.





