मुंबई – देशातील महापुरूषांचा अपमान करण्याची, आरएसएस व भाजपाच्या नेत्यांची परंपरा आहे, तर महाराष्ट्राचे नाव घेण्याचा अधिकार आहे का त्यांना? असा ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, भाजपा सरकारला प्रश्न विचारला आहे. शिवराय आणि फुले दांपत्याचा अपमान मुख्यमंत्र्यांना गंमत वाटत असेल तर ती भाजपा व आरएसएची परंपरा आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यपालांना पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या, निर्णयाचे समर्थन केल्यावरुन, शिवसेना खासदार संजय आक्रमक झाले आहेत. व आरएसएस व भाजपा सरकारच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी , भगतसिंह कोश्यारीला पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर व देशातील भाजपा सरकारवर ही टीका केली आहे. त्याचप्रमाणे राऊत यांनी नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा, उल्लेख न करण्यावरुन झालेल्या वादावरही , नाशिकचे पालकमंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. कुठल्यातरी विचारसरणीचा ठपका लावून, देशाच्या राष्ट्रध्वजाला ही न मानणारा भाजपा पक्ष आहे. भारताच्या जनता पार्टीचा खेळ देशात सगळीकडे गोंधळ चालला आहे. भारतीय जनता पार्टीकडे भरपूर वेळ आणि लोकांना
वाटण्यासाठी खुप पैसा आहे का? यांना आयटी डिपार्टमेंटला देण्यासाठी, पेसा नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यात कोश्यारींचे समर्थन करण्यावरुन भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्यांना संकुचित वाटत असेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, महात्मा फुले सावित्री फुले यांचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गंमत वाटते. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिले ,त्याचा समर्थन करत असतील तर, या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची , देशातील महापुरूषांचा अपमान करण्याची परंपरा आहे, अशी ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, भाजपावर टीका केली आहे.
त्या वेळेसही भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याला भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले होते. जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा ,त्याची सारवासारव करण्याची जबाबदारी, दिल्लीतील लोक भाजपाच्या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांना दिली जाते. काल नाशिकमध्ये आंबेडकरांचा अपमान महाजन यांनी केला आहे, तर ही भाजपा व आरएसएस आणि भाजपा नेते ,ही त्यांची परंपरा आहे. आणि जर मोदी जर कोश्यारींचा सन्मान करत असतील तर, देशातील भाजपाच्या व आरएसएसच्या या नेत्यांना महाराष्ट्राचे नाव तोंडात घेण्याचा अधिकार आहे का त्यांना?“ असा प्रश्न ठाकरे गटाचे शिवसेना खासदार, संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या प्रकरणावर बोलताना, त्या महिलेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून, ती बोलली आहे, त्या महिलेचा सन्मान व्हायला पाहिजे. तर त्या जाधव नावाच्या महिला आहेत, त्यांचा मी स्वागत करतो,“ असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.





