राजकारणात टीका टिप्पणी सुरू असते पण; मी तोंड उघडले तर भल्याभल्यांची झोप उडेल आमदार जितेंद्र आव्हाड

SHARE:

ठाणे – राजकारणात टीका टिप्पणी सुरू असते पण, मी तोंड उघडले तर भल्याभल्यांची झोप उडेल, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मुंब्रा कोणत्याही एका रंगाने माखणारा नाही, तर मुंर्ब्याचा रंग तिरंगाच राहणार आहे. जितेंद्र आव्हाडानी मुंर्ब्यामध्ये जाऊन आक्रमक भाषण केले आहे. मी जर तोंड उघडलं तर तुरुंगात जाल, त्यामुळे मुंर्ब्यात ‘आके दिखावो, जाके दिखावो’ ही भाषा चालणार नाही अशा शब्दात, जितेंद्र आव्हाडांनी एमआयएमच्या युनूस शेख यांना उत्तर दिले आहे.

’मुंर्ब्यात येऊन दाखव, तुझे हात-पाय मोडतो’ अशी भाषा करणाऱ्या एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या वडिलांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंर्ब्यात जाऊन उत्तर दिले आहे. मुंब्रा या शहराची ओळख ही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि संस्काराशी आहे. मुंब्रा हे शहर जात, धर्म आणि भाषा याच्या पलिकडे जाऊन विचार करते. त्यामुळे मुंब्रा या शहरात धर्मांध भाषा केली तर, ते धोकादायक आहे, आणि मी ते होऊ देणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुंर्ब्यात कोणताही एक रंग चालणार नाही, इथे फक्त आणि फक्त तिरंगाच चालेल, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुंर्ब्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखने केलेल्या टीकेनंतर, जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख ही मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. तसेच मी जर बोलायला लागलो तर भलेभले तुरुंगात जातील, त्यामुळे धमकीची भाषा चालणार नाही. धमकीची भाषा चालणार नाही. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचे वडील एमआयएमचे युनूस शेख यांनी दिलेल्या धमकीला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कुणी म्हणते की जितेंद्र आव्हाडला मुंब्यात पाय ठेवू देणार नाही, म्हणून मी येणार नाही असे वाटले का? जितेंद्र आव्हाडला एक लाखाहून अधिक मतांनी या शहराने जिंकवले आहे, हे लोकांचे प्रेम आहे. त्यामुळे हे ’आके दिखावो, जाके दिखावो’ ही भाषा चालणार नाही.“

राजकारणात दोन चार दिवस टीका टिप्पणी सुरू असते, मला त्याची सवय आहे. पण मी जर तोंड उघडले तर भल्याभल्यांची झोप उडेल. मी शांत बसलोय, माझ्याकडे असे अनेक प्रकरणे आहेत की, ज्यामुळे अनेकजण तुरुंगात जातील. त्यामुळे मुंर्ब्यात आल्यानंतर पाय मोडेन, असे करेन ही भाषा चालणार नाही, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.या मुंब्रा शहराच्या स्टेशनवरुन मिनारीकडे बघितले तर, समोर मुंब्रा देवीचे मंदिर दिसते. इथले रस्ते हे भारताची ओळख आहेत.

तुम्ही या शहराला कोणत्याही एका रंगाने माखू शकणार नाही, कारण हे शहर संविधानाने बांधले गेलं आहे. हे शहर फूले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आहे. हे शहर तिरंग्याचे आहे आणि तिरंग्याचे राहणार आहे. तर सत्ता अशा लोकांच्या हाती जाऊ देऊ नका, ज्यामुळे मुंब्रा बदनाम होईल, असे आव्हाड म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा