स्टॅमिना वाढवणार्‍या गोळ्या घेऊन पतीचा अनन्वित छळ; त्रासाला कंटाळून पत्नीने केला भयानक शेवट

SHARE:

सुरत : गुजरातमधील सुरत शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचून त्याला मृत्यू च्या घाटात उतरवले. पती स्टॅमिना वाढवणार्‍या गोळ्या घेऊन पत्नीशी बळजबरीने आणि विकृत पद्धतीने शारीरिक संबंध ठेवत असे. या रोजच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीला आधी दुधात विष मिसळून दिले आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुरतच्या लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव हैदर अली (३९) असे असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता आणि व्यवसायाने टाइल्स फिटिंगचे काम करत असे. कामानिमित्त तो मुंबईत राहत होता, तर त्याची पत्नी इशरत खातून आपल्या चार मुलांसह सुरतच्या लिंबायत भागात राहत होती.

हैदर अली महिन्या-दोन महिन्यातून एकदा सुरतला आपल्या घरी येत असे. मात्र, जेव्हा जेव्हा तो घरी यायचा, तेव्हा तो शारीरिक संबंधांसाठी स्टॅमिना वाढवणार्‍या गोळ्यांचे सेवन करत असे. या गोळ्यांच्या प्रभावाखाली तो पत्नीशी विकृत चाळे करत असे आणि तिच्यावर जबरदस्ती करत असे. पत्नीने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही. पतीच्या या सततच्या शारीरिक अत्याचाराला आणि ‘हैवानियत’ ला त्याची पत्नी इशरत पूर्णपणे वैतागली होती.

दुधात मिसळले उंदीर मारण्याचे औषध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी हैदर अली घरी आला होता. ३ जानेवारीच्या रात्री इशरतने पतीला मारण्याचा निर्णय घेतला. तिने थंडीचे कारण सांगून पतीसाठी हळद घातलेले दूध तयार केले आणि त्यात उंदीर मारण्याचे औषध मिसळले. हे दूध प्यायल्यानंतर हैदरची प्रकृती बिघडली आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. मात्र, पत्नीने त्याला रुग्णालयात नेले नाही.

दोन दिवस पती वेदनेने तळमळत होता. अखेर ५ जानेवारीच्या पहाटे, जेव्हा हैदर निर्जीव अवस्थेत पडला होता, तेव्हा पत्नीने त्याच्या छातीवर बसून हाताने गळा दाबला आणि त्याचा श्वास गुदमरवून हत्या केली. त्यानंतर तिने पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा बनाव रचला.

अंत्यसंस्कारावरून फुटले बिंग पतीच्या मृत्यूनंतर इशरतने नातेवाईकांना कळवले आणि मृतदेह दफन करण्यासाठी घाई करू लागली. तिने सुरतमध्येच दफनविधी करण्याचा हट्ट धरला. मात्र, हैदरचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी मृतदेह मूळ गावी बिहारला नेण्याचा आग्रह धरला. यावरून त्यांच्यात वाद झाला. पत्नीच्या संशयास्पद वागणुकीमुळे हैदरच्या भावाला संशय आला आणि त्याने लिंबायत पोलिसांना कळवले.

पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला. हैदरचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच इशरतने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्यावर भारतीय दंड संहितेनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा