नवी दिल्ली – भारतात लट्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, तर सार्वजनिक आरोग्यासाठी लट्ठपणा गंभीर संकट बनले आहे, असे भारतातील २०२६ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. भारतातील लोकल सर्कल सर्वेक्षणातील ५० हजार हून अधिक लोकांची हीच प्रतिक्रिया आली आहे. भारतात लट्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, भारतातील ७६ टक्के लोकांचे जवळचे मित्र लट्ठ आहेत.
भारत देशात लट्ठपणा झपाट्याने वाढत आहे, असे अहवालात म्हटले आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२६ मध्ये म्हटले आहे की, भारतातील लोकांमध्ये जो लट्ठपणा वाढत आहे तो सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर संकट बनले आहे. भारतात २९ जानेवारी २०२६ रोजी संसदेत सादर केलेल्या या एका सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, भारतातील लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली ही भारतातील लोकांमधील लट्ठपणाची प्रमुख कारणे आहेत.
भारतातील लोकल सर्कलने केलेल्या अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारत देशात ४ पैकी ३ भारतीय, किंवा ७६ टक्के भारतीय लोकांच्या जवळच्या वर्तुळात कोणीतरी लट्ठ व्यक्ती आहेत. भारत देशातील ६४ टक्के लोकांनी म्हटले आहे की, त्यांना माहित असलेले लट्ठ लोक सामान्यतः बसून राहतात, व्यायाम करत नाहीत आणि तेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न खातात त्यामूळे भारतातील अनेक लोकांमध्ये लट्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि भारत देशातील लोकांसाठी लट्ठपणा ही एक मोठी सार्वजनिक गंभीर समस्या बनली आहे.
भारत देशात २४ टक्के महिलांमध्ये लट्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, तर २३ टक्के पुरुषांमध्ये ही लट्ठपणाचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात , २०१९ -२१ नुसार, २४ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुषांमध्ये लट्ठ होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील 5 वर्षांखालील मुलांमध्ये लट्ठपणा वाढला आहे. देशात २०१५ -१६ मध्ये लहान मूलांमध्ये २.१ टक्के लट्ठपणा वाढला होता.
तर २०१९ -२१ मध्ये लहान मूलांमध्ये लट्ठपणा ३.४ टक्के इतका पर्यंत वाढला होता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार व भारतीय सर्वेक्षण अहवालानुसार, भारत देशातील एकुण १.४४ कोटी लहान मुलांमध्ये लट्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस रोज वाढत चाललेले आहे. त्यामूळे भारतातील तरूण पिढी व लहान मूले लट्ठ होणे ही, भारत देशातील मोठी सार्वजनिक गंभीर समस्या बनली आहे, असे भारतातील आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.




