महाराष्ट्रात राज्यसभेच्या ७ जागा लवकरच रिक्त होणार, तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार

SHARE:

मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या ७ जागा लवकरच रिक्त होणार आहे, तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यामूळे महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. महायुतीचे खासदार वाढणार आहेत. तर शरद पवारांसह काही नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे.
राज्यात सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची ताकद वाढल्याने बहुतेक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेच्या ७ जागा लवकरच रिक्त होणार आहेत. त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसणार आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. २ एप्रिल २०२० रोजी राज्यातून निवडून गेलेले ७ राज्यसभा खासदार आता निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुका होणार आहेत.

२०२० मध्ये या ७ जागांसाठी निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीने ४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदार संख्येचे प्रमाण कमी आहे. विधानसभेतील बदललेल्या आकड्यांमुळे महाविकास आघाडीला यावेळी ४ जागा मिळवणे शक्य नाही. उपलब्ध संख्याबळ पाहता, आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागेल. सत्ताधारी आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची ताकद वाढल्याने बहुतेक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.राज्यसभेची ही निवडणूक केवळ जागांची नाही. ती राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे लक्ष आहे. पुढील काही दिवसांत अनेक उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ६ जागा महायुतीच्या वाट्याला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांच्या निधनानंतर सध्याच्या बळानुसार १ जागा तर शिवसेनेला देखील १ जागा आणि उर्वरित ४ जागा भाजपला जाणार आहेत. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची गरज आहे, महाविकास आघाडीच्या 3 जागा महायुतीकडे जाणार आहेत, तर एप्रिल महिन्यात शरद पवार, काँग्रेसच्या रजनी पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान हे देखील निवृत्त होणार आहे. तर, महायुतीमधील मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, हे निवृत्त होत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणाला राज्यसभेवर पाठवले जाईल का? हा सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. शरद पवार यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या विधानात आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले होते. तसेच, दीड वर्षांनी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.

Leave a Comment

अधिक वाचा