तामिळनाडूमध्ये बर्ड फ्लू रोगाचे प्रमाण वाढले, सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

SHARE:

चेन्नई – तामिळनाडूमध्ये बर्ड फ्लू या रोगाचे प्रमाण वाढले आहे, तर त्यासंदर्भात सरकारकडून महत्त्वाच्या सूचना लागू केल्या आहेत. एच ५  एन १ या विषाणूमुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. सरकारकडून तामिळनाडू राज्यातील नागरिकांसाठी जागृतीच्या व सावधानता बाळगण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा या रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे कावळे मृत्युमुखी पडले आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा या रोगाच्या सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये एच ५  एन १ हा विषाणू असल्याची माहिती समोर आली आहे. चाचणीत कावळ्यांचा मृत्यू एच ५  एन १ या विषाणूमूळे म्हणजेच बर्ड फ्लूमुळे झाल्याचे म्हटले आहे. या बर्ड फ्लू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तामिळनाडू राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. एच ५  एन १ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा प्रोटोकॉलनुसार कावळे आणि कोंबड्यांचे सर्व मृतदेह जाळून टाकावेत किंवा खोल खड्डयात पुरावेत असे आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तामिळनाडू राज्यातील जनतेने मृत पक्षांना स्पर्श करणे किंवा त्यांना सांभाळणे बंद केले पाहिजे. पक्षांना टाळण्याचा सल्ला सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये दिला आहे. तसेच राज्यात बर्ड फ्लू संदर्भातील आजाराची व कोणत्याही घटनांची वा राज्यातील नवीन मत प्रकरणांची माहिती राज्यातील स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या, बर्ड फ्लू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी , तामिळनाडू राज्यातील सरकारी यंत्रणांना लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.

एच ५  एन १ हा इन्फ्लूएंझा ए विषाणूचा एक अतिशय धोकादायक प्रकार आहे, जो प्रामुख्याने पक्षांना आणि वन्य पक्षांना बाधित करतो. याला सामान्यतः ’बर्ड फ्लू’ म्हणून ओळखले जाते. आणि ते पक्षांमध्ये वेगाने पसरू शकते. जरी एच ५  एन १  प्रामुख्याने पक्षांना होत असला तरीही तो, कधीकधी मानवांना आणि इतर प्राण्यांना देखील होऊ शकतो. उच ५  एन १  हा विषाणू सर्वसामान्य लोकांसाठी खूप धोकादायक मानला जातो. हा विषाणू पक्षांमध्ये वेगाने पसरतो. मानवांमध्ये संसर्ग दुर्मिळ आहे, परंतु जेव्हा होतो तेव्हा गंभीर असू शकतो. अनेक मानवी प्रकरणांमध्ये न्यूमोनियासारखे गंभीर श्वसन आजार दिसून आले आहेत

Leave a Comment

अधिक वाचा