नवी दिल्ली – भारतात डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता २५ हजार भरपाई देण्यात येणार आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. भारतीयांना २५ हजार रुपये देणार आहे. २२ लाख भारतीयांना होणार याचा फायदा होणार आहे. यासंदर्भातील घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी केली आहे. मात्र हे पैसे मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत. आरबीआयच्या गव्हर्नरने ही माहिती दिली आहे.
भारतातील आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. आरबीआय गव्हर्नरनेच माहिती दिली आहे. भारत देशात दिवसोंदिवस डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. भारतातील बँक ग्राहकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय, देशातील महत्वाची बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी केली आहे. हा नवा निर्णय भारत देशातील डिजिटल फसवणूक झालेल्यांना मोठा फायद्याचा ठरणार आहे. भारतात काही लोकांचा चुकून ओटीपी शेअर केला तरी अकाऊंट मधून पैसे गेले आहेत.
देशात डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता २५ हजार रुपयांपर्यतची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे. देशातील कोणत्याही बँक ग्राहकाने चुकून आपला ओटीपी शेअर केला असेल, तरीही ही भरपाई मिळणार आहे. भारतात आरबीआयकडील ८५ हजार कोटी रुपयांच्या डीईए फंडातून ही रक्कम दिली जाणार आहे. देशात डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना ,२५ हजार रुपयांपर्यतची भरपाई मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत.
भारत देशातील बँक ग्राहकांना ही संधी एकदाच मिळणार आहे. कोणत्याही बँक ग्राहकाची डिजिटल फसवणुक झालेली भरपाई ग्राहकाला आयुष्यात फक्त एकदाच मिळू शकणार आहे. भारतातील कमी रकमेच्या फसवणुकीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्ष असणार आहे. देशात एकूण डिजिटल फसवणुकीपैकी दोन-तृतीयांश गुन्हे ५० हजार रुपयांच्या आतील आहेत. अशा छोट्या रकमांच्या व्यवहारांना या निर्णयाचा जास्त फायदा होईल. मात्र, ग्राहकाचा कोणताही गैरहेतू नसावा, अशी अट त्यात आहे. भारतातील डिजिटल फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी १५ टक्के रक्कम ग्राहकाला स्वतः सहन करावी लागणार आहे.तर उर्वरित रक्कम, कमाल २५ हजारांपर्यंत आरबीआय देणार आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
भारतात ज्येष्ठ व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा देण्यात येणार आहे. देशभरातील डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय लवकरच अतिरिक्त सुरक्षा साधने आणणार आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे. यामध्ये बँक लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी, काही कालावधीची मर्यादा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पडताळणी प्रक्रियेचा समावेश असणार आहे. सोन्याच्या दरातील चढ-उतारामुळे सोनेतारण कर्जाबाबत व्यक्त होत असलेली भीती आरबीआयने फेटाळून लावली आहे. सोनेतारण कर्जाची स्थिती मजबूत असून, चिंतेचे कारण नाही. बँकांचे लोन टू व्हॅल्यू प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असल्याने सुरक्षितता कायम आहे. एमएसएमई आणि वैयक्तिक कर्जाची गुणवत्ताही उत्तम आहे, असे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत.
देशभरात यूपीआय फ्रॉड, डिजिटल अरनेस्टबरोबर फिशिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन, डिजीटल फसवणूक करण्याचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. ही फसवणूक सोशल इंजिनिअरिंग, एआय तंत्रज्ञान आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टमचा दुरुपयोग करून केली जाते. भारत देशात २०२४ ते २०२६ मध्ये या डिजिटल फसवणुकीत वाढ झाली आहे. भारतात दरवर्षी अशाप्रकारे २२ लाख भारतीयांची डिजिटल फसवणुक करून कोट्यावधी रुपये लुटले जातात. या डिजिटल फसवणुकीतील २२ लाख भारतीयांना आरबीआयच्या या योजनेचा फायदा होणार आहे. भारतात आता डिजिटल फसवणुक झालेल्या बँक ग्राहकांना, २५ हजार रूपये पर्यत नुकसान भरपाई दिली जाणार आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.




