राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाचे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक विकत घेतले; ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत

SHARE:

मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाचे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक विकत घेतले, असा ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱेंपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदेगट शिवसेना आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. राज्यात निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होत आहे. उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर राज्यात वेगळे चित्र असते. लोक सत्ताधारी भाजपा सरकारच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील का नाही? यावर ही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.एकनाथ शिंदेंसाठी प्रत्येक निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरते आहे. व राज्यातील प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे पण चमत्कारिक आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

भारत देशात भाजपा सरकारने देशात राजकीय बाजार मांडला आहे. प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले आहे. निवडणूकांत नुसता पैशांचा बाजार मांडला आहे. राज्यात मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले आहेत. राज्यात भाजपचीच संख्या कशी काय जास्त झाली आहे? हा एक नवीन प्रश्न उपस्थित होतो आहे. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचे बुथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे नाही. तरी राज्यात भाजपाचे जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर राजकीय पक्षांतले लोक सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आहेत.

राज्यातील निवडणुका जिंकताना सत्ताधारी भाजपाने पुरेपूर पैशाचा वापर केला आहे, असे ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात आता लोक भाजपाच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात भाजपाने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व पैसेवाले लोक, कारखानदार आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यांच्या बळावर व पैशाच्या बळावर भाजपा राज्यात निवडणुका जिंकत आहे. राज्यातील फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात व पैसे वाटपाचा कार्यक्रम राबवतात. राज्यातील सर्व निवडणुका लढणे व काहीही करून सर्व निवडणूका पैशाच्या बळावर जिंकणे हाच भाजपाचा ध्यास आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते नियोजन ठरवतात. पुन्हा शिंदेकडे पैशांचे बळ आहे. शिंदे गटाने पैशाच्या बळावर जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळवल्या आहेत, तर रत्नागिरी, रायगडावर त्यांची सत्ता आली आहे, तर सिंधुदुर्ग भाजपाने ताब्यात घेतले आहे. शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला होता, त्याचा फायदा भाजपाने व शिंदेगटाने घेतला आहे. सत्ताधारी पुण्यातही जिंकले. पण राज्यातील लोक भाजपाच्या राजकारणाला यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने 165 जागा जिंकल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेना इतकी मागे राहू शकते काय? हा प्रश्न सारखा उपस्थित होत आहे. राज्यात मतदानांची आकडेवारी, निवडणूकांचा निकाल ही राज्यातील राजकीय समतोल बिघडवणारा आहे. शिवसेनेची मागे राहणे म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱेंपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे कसे काय आघाडी घेतात? हा चमत्कारिक विषय, गंभीर विषय आहे. राज्यात आता सत्ताधारी भाजपा सरकार आल्यापासून निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा सूरू झाली आहे.

राज्यातील सर्वच निवडणुका लढण्याची व निवडणूका जिंकण्याची सत्ताधारी राजकीय पक्षांचा उद्देश बनला आहे. राज्यात सत्ताधारी भाजप, शिंदे गट व अजित पवारांच्या यांच्या पक्षात राज्यातील सर्व निवडणूका काहीही करून जिंकण्याचा उद्देश वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही राजकीय भूक विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे कारण आहे. राज्यात पैशाच्या जीवावर सर्व काही हा राजकीय खेळ सूरू आहे. राज्यात जो काही हा पैशाच्या बळावर राजकीय खेळ चाले आहे ,तो अतिशय चुकीचा आहे. राज्यात तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकणार आहे, असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आज राज्यातील जनतेला सत्ताधारी भजापा सरकारकडून मूर्ख बनवले जात आहे. व पैशाच्या बळावर राज्यातील निवडणूका जिंकल्या जात आहे.

राज्यातील लोकांची भावना अशी आहे की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर राज्यातील निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. सत्ताधारी भाजपा सरकारचे प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण, बाजार करून टाकला आहे. देशात भाजपा सरकारचा सगळीकडे पैशाचा काळा कारभार सूरू आहे. राज्यात भाजपाचे लोक पैसे वाटून निवडून येत आहेत. पैसेवाल्यांचा पण पराभव होतो हे दिसले आहे.

पुणे-बारामतीत भाजपचा पराभव झाला आहे. तेथे अनेक पैसेवाले अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. राज्यात सत्ताधारी भाजपाचा पैशांचा, सत्तेचा, बळाचा अतिवापर चालला आहे. महाराष्ट्रात हे सत्ताधारी सरकारच पैशाच्या बळावर निवडून आले आहे. राज्यातील जनतेला आजही मूर्ख बनवले जात आहे आणि सर्वसामान्य जनता ही मूर्ख बनण्यास तयार आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे, असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा