मुंबइ – राज्यात आता एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग प्रशासनाने म्हटले आहे. राज्यात एसटी बसच्या सुरक्षेसाठी डिजिटल कॅमेरे बसवले जाणार आहेत. तर नवीन सीसीटीव्ही प्रकल्पातून प्रवाशांना मिळणार संरक्षण मिळणार आहे. मुंबई राज्याच्या कानाकोपर्यात धावणाऱ्या एसटी बसच्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. देशातील दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाकांक्षी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्प राबविला जाणार आहे.
राज्यातील या डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील एसटीच्या सर्व बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल सीसीटीव्हीे कॅमेरे बसवले जाणार आहेत, अशी माहिती राज्यातील परिवहन महामंडळ प्रशासनाने दिली आहे. राज्यांतील प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाेच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी १११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या साहाय्याने एसटीच्या बसस्थानके, बसआगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था यांसारख्या संवेदनशील ठिकाणी डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात एकूण ६३३ ठिकाणी ७०३५ डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर यामुळे राज्यातील एसटी बसच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल कॅमेर्यांची नजर राहणार आहे. राज्यातील या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील सीसीटीव्ही प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाचा एकूण कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
या डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले आहे. त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील डिजिटल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास ओळखून आवश्यक ती कडक कारवाई करता येणार आहे. राज्यातील या डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे.
ज्यामुळे राज्यातील एसटीबस व एसटीबस कार्यालयांची सुरक्षा होणार आहे. राज्यातील बाकी २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि बस कार्यालयांमध्ये डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची पुढील कडक कारवाई सध्या वेगाने सुरू आहे. या एसटीबसच्या डिजिटल कॅमेरा प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि एसटी बस कार्यालयांमध्ये एसटी बसच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे. राज्यातील एसटी बस प्रवाशांचा विश्वास वाढणार आहे. व डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमूळे राज्यातील कोणत्याही अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
राज्यातील नवीन सीसीटीव्ही प्रकल्प हा केवळ डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प नसून, तो राज्यातील एसटी बसच्या सुरक्षेला डिजिटल सुरक्षा देणारा प्रकल्प आहे. आणि राज्यातील एसटी बसच्या प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे, असे राज्यातील एसटी महामंडळ प्रशासनाने म्हटले आहे. यामुळे राज्यातील एसटी बसचा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीमूळे सुरक्षित होणार आहे, असे एसटी परिवहन महामंडळ प्रशासनाने म्हटले आहे.




