मुूंबई – देशांमध्ये आदिवासी आणि इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजाची परिस्थिती बिकट आहे, तर भाजपा सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहे, असा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भाजपा सरकारवर मोठा गंभीर आरोप केला आहे. देशातील भाजपा सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहे. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमी यांनी राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र राज्यात मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं ५ टक्के आरक्षण राज्यातील भाजपा सरकारकडून रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आला आहे. यावर आमदार अबू आझमी यांनी राज्यातील भाजपा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
देशात व राज्यात ही भाजपा सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकार आजपर्यत मुस्लिमांच्या विरोधात काम करत आले आहे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. मुस्लिम आरक्षणाचा कायदा रद्द केला असे राज्यातील भाजपा सरकार म्हणत आहे, पण मुस्लिम आरक्षण कायदा बनलाच नव्हता, तर राज्यातील मूस्लिम समाजाची दिशाभूल केली जात आहे ,असे अबु आझमी म्हणाले आहेत. भारत देशामध्ये आदिवासी आणि इतर समाजापेक्षा मुसलमानांची परिस्थिती बिकट बनत चालली आहे.
महाराष्ट्र राज्यात २०१४ साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार असताना मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाचा राज्य शासनाकडून निर्णय देण्यात आला होता. कोर्टाने नोकरीमध्ये असलेल्या ५ टक्के मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिली होती. शैक्षणिक मुस्लिम आरक्षण ठेवण्याबाबत सांगितलं होते. राज्य शासनाचा निर्णय आल्यानंतर विशेष सत्र बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करायला हवे होते. तेभाजपा सरकारने केले नाही. या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे, आणि या समितीने सुद्धा सांगितले होते की , या देशांमध्ये आदिवासी आणि इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजांची परिस्थिती बिकट बनत चालली आहे ,असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. देशातील भाजपा सरकार नेहमी मुस्लिमांच्या विरोधात विचार करत आहे, मुस्लिमांच्या विरोधात देशभरात काम करत आहे. देशातील भाजपा सरकार वेळोवेळी मुस्लिम समाजाचा तिरस्कार करत आहे, असे अबु आझमी म्हणाले आहेत.
देशातील व महाराष्ट्र राज्यातील भाजपा सरकार ही संपुर्ण मुस्लिम समाजाची जाणूनबूजून दिशाभूल करत आहे, हे सगळे राजकारण भजापा सरकार व त्याचे नेते लोक निवडणूकीतील मतांसाठी करत आहे, असे समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयात राज्यातील मुस्लिम समाजाला देण्यात आलेले २३ डिसेंबर २०१४ रोजीचे मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता.
त्यावेळच्या महाराष्ट्र राज्यातील सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आणि राज्यातील मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्के झाले होते. राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मुस्लिम समुदायासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता राज्यातील भाजपा सरकार राज्यातील मुस्लिम समाजाच्या विरोधात काम करत आहे. व राज्यातील मुस्लिम समाजाची वेळोवेळी दिशाभूल करत आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी म्हणाले आहेत.




