धुळे – जिल्ह्यात साक्री येथे लग्नाच्या हळदी समारंभात दोन गटातील वादात ३ जणाचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यात एका साखरपुड्याच्या समारंभात दोन गटात मोठा वाद झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. आनंदाच्या आणि उत्सवाच्या समारंभात हा जीवघेणा प्रकार घडला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या हळदी समारंभात मोठा वाद झाला आहे. दोन गटांतील वादातून झालेल्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरळनेर ता. साक्री येथे एका विवाहाची मोठी तयारी सुरू होती.
गुरुवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने वराकडील मंडळी आणि पाहुणे आले होते. लग्न समारंभ जवळ असल्यामूळे हळदीचा कार्यक्रम सुरू असताना दोन गटात अचानक मारहाण सुरू झाली. हा वाद सूरू असताना काही जणांनी धारदार चाकूने एकमेकांवर हल्ला केला आहे. या प्राणघातक चाकू हल्ल्यात दोघांचा पिंपळनेरमध्येच जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी धुळ्यातील रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला आहे. काही तासांवर लग्न असताना, मंगल कार्यालयात आनंदाच्या प्रसंगात हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याघटनेनंतर काही वेळात लग्नाच्या मंडपात आक्रोश आणि शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. एका लग्नाच्या आनंदी सोहळ्याचे रूपांतर मोठ्या वादात झाले आहे. या घटनेमूळे संपूर्ण धूळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. पिंपळनेरमधील नीळकंठ नगरात गोसावी समाजातील एका विवाह सोहळ्यानिमित्त साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. यावेळी साक्री आणि सोनगड गुजरात येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये जुन्या वादातून लग्न मंडपात मारहाण झाली आहे. माहितीनुसार, काही नातेवाईकांनी व्हॉटसअपवर एकमेकांना डिवचणारे स्टेटस ठेवले होते. या डिजिटल वादामूळे प्रत्यक्ष भेटल्यावर मोठा वाद झाला आहे. आणि वादाचे रूपांतर नंतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. या जीवघेण्या हल्ल्यात एमकेकांवर चाकूने हल्ला कण्यात आला आहे.
काही नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार केले आहेत. या मारहाणीमध्ये एकूण ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, मात्र उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे. धूळे जिल्ह्यातील या मारहाण प्रकरणात यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभु गिरी गोसावी आणि हर्षु शंभु गोसावी यांच्यावर नातेवाईकांनी हल्ल्याचे आरोप केले आहेत. आनंदाच्या वातावरणात असलेल्या लग्नमंडपात अचानक मोठी मारहाण होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामूळे लग्न असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या जुन्या वादाचे नेमके स्वरूप काय होते, याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अधिक तपास धूळे पोलिस करत आहेत.





