बीड – जिल्ह्यात लाच मागितल्याच्या प्रकरणात तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. तर नांदेड येथील घरातून सोने व रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणात एसीबीने ही कडक कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कडक कारवाई केली आहे, तर लाच मागितल्याच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर झालेल्या कडक कारवाईनंतर बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, एक प्रमाणपत्र काढून देण्यासाठी परळीचे तहसीलदार मुंडे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. कागदपत्रे पडताळणी सूरू असताना त्यांनी चिट्ठीवर ५० आणि नंतर २५ असे आकडे लिहून पैशाची मागणी केली आहे. एसीबीच्या तपासात ही घटना उघडकीस आली आहे. तक्रारदाराने २० हजार रुपये देतो असे सांगितल्यावर ही २३ हजार रुपये देण्यास सांगितले आहे, अशी एसीबीने माहिती दिली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
एसीबीने ३ वेळा तहसिलदाराला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र कारवाईची चाहूल लागल्याने तहसिलदार मुंडे यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागितल्याचे पुरावे मिळाले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यातील परळीचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना एसीबीने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कडक कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने मुंडे यांच्या नांदेड येथील यशोविहार परिसरातील घराची तपासणी केली आहे. या तपासात परळीचे तहसिलदार मुंडे यांच्या घरात १३ तोळे सोने आणि ५५ हजार रुपये रोख रक्कम जप्त केले आहेत.
या कारवाईत तहसिलदार मुंडे यांच्याजवळ असलेले ८० हजार रुपये किमतीचे २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परळीमध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परळीतील कन्हेरवाडी येथील शेतकरी हनुमंत फड यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करूनही काम झाले नाही. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय लोकांच्या सांगण्यावरूनच प्रशासकीय कामे होत आहेत, असा आरोप शेतकरी हनुमंत फड यांनी केला आहे.
राज्यात अशा प्रकारचा बीड जिल्हा प्रशासनाचा व परळीतील सरकारी कार्यालयातील मनमानी कारभार थांबला पाहिजे, अशी मागणी परळीतील शेतकरी बांधवांनी केली आहे. बीड जिल्ह्यात तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई झाल्याने बीड जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई व्हावी आणि सर्वसामान्यांची व जिल्ह्यातील शेतकरी लोकांची कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत, अशी मागणी बीड जिल्ह्यातील स्थानिक नागरिक व शेतकरी बांधवांनी केली आहे. या प्रकरणात अधिक तपास एसीबी करत आहे.





