नवी दिल्ली – व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी व्हीआरएस कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. दरम्यान डीजीसीएकडून व्हीआरएस कंपनीच्या विमानांचे ऑडिट केले. या ऑडिटमध्ये वीएसआर कंपनीच्या चार विमानांमध्ये देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचं डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यानंतर डीजीसीएने व्हीआरएस कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आमदारांकडून सातत्याने व्हीएसआर कंपनीवर आरोप केले जात होते. आता डीजीसीएने व्हीएसआर कंपनीच्या चार विमानाच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. आर एटीव्हीआर एस आणि विटीव्हीआरए आणि विटीआर स्टील द म्हणजे हे कंटिन्यू या विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच लेजेट ४०, ४५ आरएस टीआरआय या विमानांच्या उड्डानावरही बंदी घालण्यात आलीय. विमानांमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.
२८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिअरजेट ४५ विमानाच्या अपघातानंतर, डीजीसीएने या कंपनीचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. ऑडिट टीमला या कंपनीच्या हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी लक्षात घेता नोंदणीकृत लिअरजेट ४०/४५ विमानांना तात्काळ ग्राउंडिंग करून सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीसीएकडून पुढील मूल्यांकनासाठी गैर-अनुपालनांचे मूळ कारण विश्लेषण सादर करण्यासाठी वरील उल्लेखित क्षेत्रांमध्ये व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला कमतरता अहवाल फॉर्म जारी करण्यात आले आहेत.
डीजीसीएने सुरक्षेच्या कारणामुळे तात्काळ व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय असे नोंदणी क्रमांक असलेले चार लिअरजेडट ४०/४५ विमाने ग्राउंड केली आहेत. ही विमाने पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत आणि सुरक्षित होईपर्यंत ग्राउंड केलेलीच राहतील. या कमतरता का निर्माण झाल्या, याचे स्पष्टीकरण डीजीसीएने कंपनीकडून मागितले आहे. कंपनीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच डीजीसीए पुढील कारवाईचा निर्णय घेईल. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाचे आहे आणि नियमांचे कोणतेही उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. हा व्हीएसआर कंपनीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रोहित पवार यांच्या आरोपानंतर अनेक विमान कंपन्याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याप्रकरणी डीजीसीएची प्राथमिक चौकशी सुरू होती. डीजीसीएनं व्हीएसआरची चौकशी सुरू केली, त्यानंतर व्हीएसआर विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली.




