राज्यातील समृद्धी महामार्गाच्या जमीन घोटाळा प्रकरणात सीआयडी चौकशी करावी; शिवसेना नेते अंबादास दानवे यांची मागणी

SHARE:

संभाजीनगर – राज्यातील समृद्धी महामार्गाच्या जमीन घोटाळा प्रकरणात सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. संदीपान भुमरे यांनी समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा घोटाळा केला आहे, व ड्रायव्हरच्या नावे बक्षीसपत्र बनवले आहे. अंबादास दानवेंच्या या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

जटवाडा जमीन प्रकरणात ११५० कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील २३ एकर ३० गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे बक्षीस पत्र करून बळकावली आहे.

अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर बक्षीस पत्र करण्यात आली आहे. हा बक्षीसपत्र १९७१ साली झाल्याचे दाखवले आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म १९८५ मध्ये झाला आहे. त्यामुळे १९७१ मध्ये त्याच्या नावावर बक्षीसपत्र कसे होऊ शकते? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केल्याचे सांगितले जाते.

राज्यातील समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याचे आदेश झाल्यानंतर तिचे संपादन मूल्य ११५० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करत पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी सांगितले की, सीआयडी चौकशी झाल्यास सर्व सत्य बाहेर येणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा