मुंबई – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर व्हीएसआर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं नागरी विमान वाहतूक महासंचालनाने (डीजीसीए) चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घातली. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा आरोप केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला. त्यामुळे डीजीसीएच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली.
तितकीच तत्परता व्हिएसआर संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. थातुरमातुर कारवाई करुन चार विमानांवर बंदी आणत असतील तर जनतेच्या मनातला जनक्षोभ आणखी वाढेल, असा इशारा मिटकरी यांनी दिला.
डीजीसीएने एक महिन्यानंतर अहवाल दिला आहे. ब्लॅक बॉक्स तीन आठवड्यांनी जळालेल्या अवस्थेत सापडला.अजितदादाना देण्यात आलेलं व्हीएसआर कंपनीचं विमान नादुरुस्त आहे, हा दावाही आम्ही आधीच केला आहे. सुमीत कपूरची हिस्ट्री ऑॉन ड्युटी दारु पिण्याची आहे. त्याबाबत एकही शब्द या अहवालात नाही. त्यामुळे आम्ही या कारवाईवर समाधानी नाही. डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
डीजीसीएला वाटलं की सगळं घडून गेलं आता काही होणार नाही. पण पत्रकार परिषदा सातत्याने होत होत्या. त्यामुळे डीजीसीएला कळलं की हे प्रकरण आपल्या अंगलट येणार, त्यांना याची कल्पना होती की व्हीएसआरकंपनीची विमानं नादुरुस्त आहेत, त्यांनी हे मान्य केलं. ही कंपनी कायमची बंद झाली पाहिजे. या कंपनीने प्रत्येक पायलटचा ५० कोटींचा विमा काढला आहे, सुमित कपूरला सुसाईड बॉम्बर म्हणून तिथे होता, अशी शंका आम्हाला आहे. त्याबाबत कंपनीने उत्तर दिलं पाहिजे. नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला.
डीजीसीए फक्त भुलथापा देण्याचा प्रयत्न करते, कारण गाव पातळीवर आता वातावरण पेटायला लागल आहे. त्यांच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही, मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान का देण्यात आलं? असा प्रश्नही अमोल मिटकरींनी यावेळी उपस्थित केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलंय. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी अमोल मिटकरी खळबळ दावा करताना म्हणाले होते कि अजित पवारांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत. मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? अशा प्रश्नांचा भडीमार अमोल मिटकरी यांनी केला होता.
यासोबतच त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही सवाल उपस्थित केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊ द्या, सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत, असेही अमोल मिटकरी म्हणाले होते.




