मुंबई – भाजपा सरकारची कर्जमाफी योजना हा शेतकर्यांना फसवण्याचा प्रकार आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यात केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे नुसते आश्वासन आहे. राज्यातील भाजपा सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना गंडवले आहे, अशी उध्दव ठाकरेंनी टीका केली आहे.
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना फसवी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महायुती सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन फक्त अर्थसंकल्पात मांडले आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. परंतु भाजपा सरकारची ही योजना ही नुसती फसवाफसवी असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
नुसते आश्वासन देणारे भाजपा सरकार आहे. ही योजना कधीपर्यंत पूर्ण करणार? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच भाजपा सरकारने राज्यात आतापर्यत शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नुसती फेकाफेकी केली आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांनो राज्यातील हे लबाडवृत्तीचे राज्य सरकार आहे.
राज्यात या भाजपा सरकारने 48 लाख कुणबी नोंदी केल्या आहेत म्हणतात. राज्यात किती जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत आता आकडेवारी आली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा सरकारची २०१७ सालची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो हे लबाड भाजपा सरकार आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीची योजना हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी विचारला आहे. हे भाजपा सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी का सांगितले नाही. तसेच भजापा सरकार मोठ्या योजना जाहीर करत आहे, शेतकरी लोकांना फसवी आश्वासने देत आहे. राज्यात सरकारी योजना नावाला जाहीर करायच्या, त्या लवकर पुर्ण होत नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
भाजपा सरकार राज्यातील शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करणार होते, त्याचे काय झाले? राज्यातील भाजपा सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन का पूर्ण केले नाही? ही पण सरकारी योजना २०४७ पर्यंत घेऊन जाणार आहे का? भाजपा सरकार राज्यातील कोणतीही योजना कालबद्ध पद्धतीने राबवत नाही. तुम्ही शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार होतात त्याचे काय झाले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.




