शाळेत महिला शिक्षिकेचा राजेशाही थाट; विद्यार्थ्यांकडून करवून घेतली मालिश, नागरिकांमध्ये संताप

SHARE:

उत्तर प्रदेश – शाळा हे शिक्षणाच मंदिर आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे बाळकडू पाजले जातात. मात्र याच शाळेत एका महिला शिक्षिकेचा राजेशाही थाट दिसून आहे. ज्या व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील कार्वी भागातील एका सरकारी प्राथमिक शाळेचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका लहान विद्यार्थ्यांकडून शरीराची मालीश करताना दिसून येत आहे. व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की मुख्याध्यापिका तरुणी विद्यार्थिनींकडून स्वतःची मालिश करून घेत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आणि असह्य आहे.

ही घटना कार्वीच्या नया बाजार येथील प्राथमिक शाळेत घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेच्या जमिनीवर एक चटई पसरलेली दिसते, ज्यामध्ये काही विद्यार्थिनी मुख्याध्यापिकेला मालिश करताना दिसत आहेत. मुख्याध्यापिका आरामात पडलेल्या दिसत आहेत तर विद्यार्थिनी त्यांच्या पायांनी आणि हातांनी मालिश करत आहेत. मुख्याध्यापिका मोबाईल फोन वापरत असताना एका विद्यार्थिनीला बेलनने मालिश करतानाही दाखवण्यात आले आहे. शाळेच्या वेळेत हे प्रकरण घडल्याने पालक आणि समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, मुख्याध्यापिकेचे नाव मधु कुमारी आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की ही घटना केवळ शिक्षकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही तर मुलांच्या सुरक्षितता, आदर आणि नैतिक मूल्यांबद्दलही गंभीर चिंता निर्माण करते. प्रशासकीय पातळीवर हे प्रकरण गांभीर्याने घेत, शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. विभागाने असे म्हटले आहे की शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. दरम्यान, स्थानिक प्रशासन देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वापरकर्त्यांनी याला शिक्षण व्यवस्थेचे अपयश म्हटले आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. शाळेत असा प्रकार कसा घडला आणि जबाबदार लोकांनी तो थांबवण्यासाठी पावले का उचलली नाहीत, असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा