मुंबई – हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात उन्हाळा अधिक तीव्र होणार आहे, असे राज्यातील हवामान खात्याच्या तज्ञांनी म्हटले आहे. राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे लोहगाव येथे ३८.५ तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंदवण्यात आले आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भात तापमान ४० च्या वर गेले आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने उष्णता जाणवू लागली आहे.
पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४०.८ तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती येथे ४०.६ , वर्धा जिल्ह्यात ४० तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच विदर्भात उन वाढू लागले आहे. राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढल्याचे दिसत आहे. पुणे व जळगावमध्येही जास्त तापमानाची नोंद झाली आहे, तर नागपूरमध्ये ३८.७ , तापमान व कोल्हापूरमध्ये ३०.७ तापमान नोंदवण्यात आले आहे.
राज्यात हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे उन्हाळा अधिक तीव्र होणार आहे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. जगभरात वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि वेगाने वाढणारे शहरीकरण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.
जागतिक हवामान बदल निर्देशांकात भारताचा क्रमांक २३ वा असून हवामान धोक्याच्या बाबतीत भारत जगात ९ व्या स्थानावर आहे. तसेच २०२५ ते २०२९ हा कालावधीत जागतिक तापमानाचे स्तर वाढु शकतो, असा हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात जानेवारी अखेर आणि मार्चच्या सुरुवातीलाच उष्णता वाढली आहे. यांमूळे उन्हाळा अधिक तीव्र होणार आहे.



