पंढरपुर – पोलिसांकडून ट्रक चालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात २ वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पंढरपूरच्या वाहतूक पोलिसांच्या मारहाणीचा प्रकार अधिवेशनात आमदार खरे यांनी उपस्थित केला होता. आता या प्रकरणातील पंढरपुरातील दोन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण झाली होती. व ३ हजार घेतले होते. याप्रकरणात दोन वाहतूक पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
पंढरपूर शहरात नो एंट्रीमध्ये घुसल्याचे कारण दाखवत ट्रक चालकाकडून ज्यादा पैसे घेतले होते. आणि त्याला मारहाण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या दोन वाहतूक पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. पंढरपुर शहरातील सांगोला चौकात एक ट्रक आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून ३००० रुपये घेतले होते, व फक्त १००० रुपयाची पावती दिल्याचा आरोप या ट्रक चालकाने केला होता. यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी जाब विचारणाऱ्या ट्रक चालकाला मारहाण केली होती.
यावेळी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. चालू विधानसभा अधिवेशनात आमदार खरे यांनी पंढरपूरच्या वाहतूक पोलिसांचा हा प्रकार उपस्थित केला होता. पंढरपूर शहरातील सांगोलाकडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिस बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या ट्रक चालकाने नो एन्ट्रीमध्ये वाहन आणल्याने पोलिसांनी तीन हजार रुपये घेतले. तसेच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही, असा आरोप ट्रक चालकाने केला आहे.
तसेच काही अंतर गेल्यावर चालकाच्या मोबाईल वर एक हजार रुपये दंड भरल्याचा मेसेज आला. यानंतर चालकाने दंड कसला याबाबत पोलिसांना विचारणा करण्यासाठी परत आला असता, पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. नो एन्ट्री मध्ये घुसल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, आणि दंडाची पावती दिली आहे, असे शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.




