केंद्रातील भाजपा सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने जनतेमध्ये आक्रोश वाढला; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

SHARE:

हिंगोली – केंद्रातील भाजपा सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने जनतेमध्ये आक्रोश वाढला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. भारतात आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला नुकसान सोसावे लागत आहे.इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे भारतात घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशात घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वाढलेल्या आहेत. तर इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशाच्या परिस्थिती खुप गंभीर बनत चालली आहे. भारत देशातील शेतकर्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कळमनुरी ते हिंगोलीत आयोजित पदयात्रेत ते बोलत होते. या पदयात्रेद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत.

अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे भारतातील शेती व्यवसाय व शेतकरी बांधवांचे खुप मोठे नुकसान होत आहे. भारत देशातील भाजपा सरकारकडे ठोस आंतरराष्ट्रीय धोरण नसल्याने इंधनासारख्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. केंद्रातील भाजपा सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा भारतातील सर्वसामान्य जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे. भारतात सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी देशातील भाजपा सरकारच्या मनमानी व हूकुमशाही पध्दतीने चाललेल्या कामकाजावर टीका केली आहे. भारताच्या संसदेत सत्ताधाऱी लोकांना प्रोत्साहन दिले जाते, तर देशातील इतर राजकीय पक्षातील विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर केला आहे. भारतीय संसदेत विरोधी पक्षांच्या लोकांना चर्चासत्रात बोलू दिले जात नाही. पार्लमेंटरी शब्द उच्चारण्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. केंद्रातील भाजपा सरकारचा भारतातील लोकशाहीला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सूरू आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा