मुंबई – भाजपा सरकारकडून आंतरराष्ट्रीय धोरणाच्या नावाखाली देशातील नागरिकांची आर्थिक कोंडी केली आहे, असा आरोप शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. सध्या इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. भारताला त्याचा मोठा फटका बसत आहे. याच मुद्यावरुन शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे.
भारताला देखील मोठा फटका बसत आहे. भारत देशात घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. देशातील सध्या वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे परिणाम आता भारतात दिसत आहेत. पण त्या युध्दाच्या निमित्ताने भारतातील सर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी करत आहे.
देशातील इंधन व रोजच्या गरजेच्या वस्तुची महागाई वाढली आहे.हे भाजपा सरकारच्या कोणत्या धोरणात बसते आहे? असा प्रश्न डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. महाराष्ट्र राज्यात माझ्या मतदारसंघातील चाकण, हडपसर-भोसरीच्या पट्ट्यातील उद्योगांना ऊर्जेचा आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. अनेक कंपन्या ५० टक्के क्षमतेने चालत आहेत. तर काहींनी उत्पादने थांबवली आहेत. कामगारांच्या हाताला काम नाही, आणि उद्योजकावर मंदीचें सावट पसरले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गॅस पुरवठा खंडित झाला आहे.
देशात हॉटेलं व्यवसाय बंद पडलले आहेत, कष्टकऱी, कामगार लोकांचा रोजगार बुडत आहे, आंतरराष्ट्रीय धोरणाच्या नावाखाली भारतात इंधन दरवाढ केल्यामूळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपा सरकार अपयशी ठरलेले सरकार आहे. महाराष्ट्र राज्यांतील शेतकऱ्यांची साखर बंदरांवर धूळ खात पडली आहे. आणि राज्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांचा शेतमाल सडतो आहे. परंतु देशातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे.
भारताला विश्वगुरु म्हणणारे भाजपा सरकार आणि प्रधानमंत्री मात्र गप्प बसले आहेत. देशातील या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भाजपा सरकारने पार्लमेंटरी जॉइंट कमिटीची बैठक बोलावून यावर चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. देशात भाजपा सरकारचे परराष्ट्र धोरण जर देशांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा आणि स्वस्त जीवन देऊ शकत नसेल, तर ते धोरण फसलेले आहे. सध्या इराण-इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे.
आतापर्यंत, फक्त कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या किमती वाढण्याबद्दल चर्चा सुरु होती. परंतू, जगातील अर्थतज्ज्ञांच्या मते हे अर्धे चित्र दिसत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक थांबण्यापेक्षाही धोकादायक म्हणजे खत पुरवठा साखळीत व्यत्यय आणला जात आहे. येत्या काही महिन्यांत जागतिक अन्न उत्पादन कमी होणार आहे, आणि देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे, असे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.





