चोरीच्या संशयावरून २ अल्पवयीन मुलींना रात्रभर उलटे टांगल्याचा प्रकार उघड; अल्पवयीन मुलींना उलटे टांगून छळ, तर या घटनेत एका मुलीचा मृत्यू

SHARE:

सांगली – जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून २  अल्पवयीन मुलींना रात्रभर उलटे टांगल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तर या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. चोरीच्या संशयाने दोन अल्पवयीन मुलींना रात्रभर उलटे टांगल्याचा प्रकार घडल्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीआहे. चोरीच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलींना उलटे टांगून रात्रभर छळ करण्यात आला आहे.

या अत्याचारात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी सानिका हिचा मृत्यू झाला आहे, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे आटपाडी तालुक्यातील बनपुरी परिसर हादरला आहे. माहितीनुसार, केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने रागाच्या भरात या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच आई-वडिलांकडून असा हा भयानक अत्याचार करण्यात आला आहे. नाना हैबत यमगर असे या दोन अल्वयीन मुलींच्या वडिलांचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी मुलींच्या वडिलांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले होते. रात्रभर त्या दोन अल्पवयीन मुली वेदनेने तडफडत पाणी मागत होत्या. मात्र, निर्दयी आई-वडिलांनी त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना मदत केली नाही, पाण्याचा थेंबही दिला नाही. रात्रभर टांगुन ठेवल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा या छळाने मृत्यू झालेला आहे. वेदना सहन करताना एका 10 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलगी सानिकाचा रात्रीच मृत्यू झाला आहे.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई-वडील त्या खाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी त्या दोन अल्पवयीन मुलींच्या आजोबांनी त्या मुलींना खाली उतरवले आहे. मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला होता. या घटनेत एक अल्पवयीन मुलगी सानिका हिचा मृत्यू झघला आहे, तर दुसरी अल्पवयीन मुलगी अनुजा बेशुद्ध अवस्थेत पडली होती. यांनतर दुसरी अल्पवयीन मुलगी अनुजाला ही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तर सानिकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले असताना तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. हा सर्व प्रकार अल्पवयीन बहिणीच्या जबाबातून उघड झाला आहे. दुसरी अल्पवयीन मुलगी अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघड झाला आहे. वडिलांनी आम्हाला दोघी बहिणींना उलटे टांगून मारहाण केली आहे, असे तिने सांगितल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली आणि या घटनेचा भांडाफोड झाला आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून संबंधित आरोपींवर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने राज्यातील बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास आटपाडी पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा