पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणात पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकून वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे. २६ वर्षाच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरीतील त्या स्पा सेंटरमध्ये पाऊल ठेवताच पोलीसही चक्रावून गेले आहेत. या कारवाईत ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सम्राट चौकातील रिच फील स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कडक कारवाई केली आहे.
यावेळी ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक स्पा सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. आता पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सम्राट चौकातील रिच फील स्पावर कडक कारवाईकरण्यात आली आहे.
माहितीनुसार, सम्राट चौकातील स्पा सेंटरमध्ये ही कारवाई केली आहे. इथे परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आहे. आणि बुधवारी २५ मार्च २०२६ रोजी या स्पा सेंटरवर धाड टाकली आहे. या प्रकरणात स्पा सेंटरचे चालक मयूर मोहिते रा. दिघी आणि मॅनेजर अक्षय सुतार रा. निगडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या 3 महिन्यांत अवैध धंद्यांविरोधात मोठी कडक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ कारवायांमध्ये एकूण १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर, २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील ३ वर्षांत अशा प्रकारचे अवैध व्यवसाय करणार्या २९ स्पा सेंटरवर व चालविणार्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कडक कारवाईनंतर आता मावळ तालुक्यातील स्पा सेंटरवरही अशीच धडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात अधिक तपास पिंपरी-चिंचवड पोलिस करत आहेत.





