देशभरात सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सुरक्षिततेसाठी, १ एप्रिलपासून ऑनलाईन व्यवहार करण्याची पद्धत बदलणार; भारतीय रिजर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

SHARE:

नवी दिल्ली – देशभरात सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सुरक्षिततेसाठी, १  एप्रिल २०२६ पासून ऑनलाईन व्यवहार करण्याची पद्धत बदलणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने १  एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व ऑनलाइन व्यवहारांसाठी पासवर्ड बंधनकारक केले आहे. डायनॅमिक ओटीपी, फिंगरप्रिंटमुळे सर्व ऑनलाइन व्यवहारांचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे. आजच्या धावपळीच्या काळात हातात पैसे फार कमी आणि फोनमध्ये जास्त, त्यातही ऑलनाईन गुगल पे किंवा फोन पे किंवा किंवा भीम ॲप वापरणाऱ्यांची संख्या भारत देशात जास्त वाढली आहे.

त्यामुळे भारत देशात जे नागरिक ऑनलाइन पेमेंट करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाची घडामोड आहे. १  एप्रिल २०२६ पासून तुमचे ऑनलाईन व्यवहार करण्याची पद्धत बदलणार आहे. देशभरात सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सर्वसामान्य नागरिकांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी पासवर्ड सक्तीचे केले आहे. यामुळे आता फक्त एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, तर तुम्हाला सुरक्षेच्या दोन थरांतून जावे लागणार आहे.

आत्तापर्यंत आपण अनेकदा एकच स्टॅटिक पिन वापरून झटपट ऑनलाईन पेमेंट करत होतो. पण आता बँकेला किंवा फिनटेक कंपन्यांना तुम्हाला दोन पर्याय द्यावे लागतील. यातला एक पर्याय डायनॅमिक असणे बंधनकारक आहे. म्हणजेच, तो कोड किंवा सुरक्षा निकष प्रत्येक ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळा असेल आणि तो त्याच वेळी तयार होईल. १  एप्रिल २०२६ पासून सर्व ऑनलाइन व्यवहारांसाठी आरबीआयने फक्त पासवर्ड नवीन सुरक्षा पद्धत सक्तीची केली आहे.

बँक ग्राहकांना नेहमीचा पिन टाकावा लागेल आणि मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्डही द्यावा लागेल. तुमच्या अंगठ्याचा ठसा किंवा फेस आयडी आणि तुमचे रजिस्टर असलेले डिव्हाइस यांचा मेळ घातला जाईल. हार्डवेअर टोकन किंवा पासवर्डचा वापर करून ओळख पटवली जाईल. आरबीआयने या नियमात बँका आणि कार्ड कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. भारतात जर या नव्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही चुक राहिली आणि त्यामुळे बँक ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकेची किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची असणार आहे.

यामुळे देशातील सर्व बँकांना आता आपली ऑनलाईन सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी लागणार आहे. हॅकरला तुमचा पासवर्ड कळाला, तरीही जोपर्यंत तुमच्याकडे येणारा डायनॅमिक ओटीपी किंवा तुमचा फिंगरप्रिंट त्याच्याकडे नसेल, तोपर्यंत तो तुमच्या खात्यातून एक रुपयाही काढू शकणार नाही. देशातच नाही, तर परदेशात पैसे पाठवतानाही हे नियम लागू होणार आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय ऑनलाईन व्यवहारांसाठी हे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून संपुर्ण देशभरात लागू होणार आहेत.

देशातील बँक ग्राहकाला कोणता सुरक्षा पर्याय सोपा वाटतो, हे निवडण्याची मुभा मिळणार आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार देशभरात ऑलनाईन सर्व व्यवहारांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. पण भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी ही प्रक्रिया करणे आता गरजेचे बनले आहे. त्यामुळे भारत देशातील बँक ग्राहकांना १  एप्रिल २०२६ पूर्वी आपल्या बँक खात्याची माहिती आणि मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायला लागणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा