खेळ : आयपीएल २०२६ चा सीजन सुरु झालाय. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन एका पॉडकास्टमध्ये बऱ्याच विषयांवर मनमोकळेपणाने बोललाय. तुझ्यावर जेव्हा टीका होते, तू कसा शांत राहतोस? यावर सुद्धा अर्जुन बोललाय.
सलग दोन सीजन मुंबई इंडियन्स टीमचा भाग राहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकर आता आयपीएल २०२६ मध्ये नव्या फ्रेंचायजीकडून खेळताना दिसणार आहे. अर्जुन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. मैदानातील त्याच्या कामगिरीवर नेहमीच मीडियाचं बारीक लक्ष असतं. अर्जुन तेंडुलकर यंदाच्या सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स फ्रेंचायजीचा भाग आहे. ऋषभ पंत या टीमचा कॅप्टन आहे. अर्जुनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार किंवा नाही, या बद्दल काही ठामपणे सांगता येणार नाही. अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर आहे. लिलावात अर्जुनला त्याच्या बेस प्राइसला ३० लाख रुपयात विकत घेतलं. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एकाना क्रिकेट स्टेडियममधून एलएसजीच्या आयपीएल २०२६ च्या सीजनला सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा पहिला सामना आहे.
मैदानावर तू कसा शांत राहतो? यावर बोलतानाचा अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शुभांकर मिश्रा अर्जुनला विचारतो, तू स्वत:ला शांत कसं ठेवतोस? त्यावर अर्जुनने उत्तर दिलं की, ‘गोव्यात माझ्याकडे पाच कुत्रे आहेत. मी त्यांच्यासोबत खेळण्यात वेळ घालवतो’. तुझे कोणी क्रिकेटर मित्र आहेत का? असा प्रश्न शुभांकरने विचारला. त्यावर अर्जुन म्हणाला की, ‘माझे क्रिकेटर मित्र नाहीयत. माझे बहुतेक मित्र क्रिकेट खेळत नाहीत’
नुकतचं झालय लग्न
तू टीकेला घाबरतोस का? या प्रश्नावर अर्जुनने ‘अजिबात नाही’ असं उत्तर दिलं. अर्जुन तेंडुलकर दोन सीजन मुंबई इंडियन्समध्ये होता. तो पाच सामने खेळला. यात त्याने तीन विकेट काढले आणि १३ धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच ५ मार्च २०२६ रोजी सानिया चंडोक सोबत विवाह झाला. त्यानंतरचा त्याचा हा पहिला आयपीएल सीजन आहे. अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.नेट्समध्ये अनेकदा तो भेदक गोलंदाजी करताना दिसतो.
Shubhankar Mishra ~ अपने आप को कूल कैसे रखते हो आप?
Arjun Tendulkar_ मेरे पास गोवा में पांच डॉग्स है जिनकी साथ में खेलता हूं!
Shubhankar Mishra~ क्रिकेटर दोस्त हैं आपके?
Arjun Tendulkar_ मेरे क्रिकेटर दोस्त नहीं है मेरे ज्यादातर दोस्त क्रिकेट नहीं खेलते! pic.twitter.com/IzrolfX0gZ
— लेखराज गुर्जर हिंडोली बूंदी (@LekharajaB76180) March 31, 2026
‘अर्जुन कसा खेळणार?’
काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? यावर थेट भाष्य केलं होतं. “लखनऊच्या टीममध्ये मयांक यादव, मोहसीन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी सारखा बॉलिंग लाइन अप आहे. त्यामुळे अर्जुन कसा खेळणार? त्या टीममध्ये बऱ्याच दुखापती झाल्याशिवाय अर्जुनला संधी मिळेल असं मला वाटत नाही” असं अश्विन सरळ बोलला होता.





