नागपूर – जनगणनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे १० जणांविरोधात महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात जनगणनेच्या कामात भाग न घेणाऱ्या १० जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ही कडक कारवाई नागपूर महापालिकेकडून करण्यात आली आहे. नागपूरमध्ये जनगणना २०२६-२७ च्या जनगणनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. या जनगणनेच्या कामात सहभाग नाकारणार्या शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधात महापालिकेनेकडून आयपीसी कलम १८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
देशभरात १ एप्रिल २०२६ पासून जनगणना २०२६-२७ च्या कामाला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात आता नागपूर महापालिकेने कडक पाऊल उचलले आहे. देशातील जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचार्या विरोधात आता कारवाई होणार आहे, असे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील सहाय्यक आयुक्तांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात तक्रार नागपूर मधील यशोधरा नगर पोलिस ठाण्यात शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. देशीरात चाललेल्या जनगणना प्रक्रियेसाठी देण्यात आलेले आदेश न पाळणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या संबंधित शैक्षणिक कर्मचाऱ्यांवर केला आहे. नागपूर महापालिकेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या कडक कारवाईत १ प्राचार्य, ४ शिक्षक, १ मुख्याध्यापक अशा नागपूरमधील एकूण १० शैक्षणिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत दुर्लक्ष केल्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,ं संबंधित शैक्षणिक कर्मचाऱ्यांनी जनगणना कामासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नेमणूक आदेश स्वीकारण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने याला गंभीर बाब मानली आहे.
त्यामूळे महापालिकेने संबंधित शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई केली आहे. नागपूर महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, देशातील जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करणार आहे. आवश्यकतेनुसार कर्मचार्यांवर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा नागपूर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





