बीड – मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेऊन सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात जोपर्यंत मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, परत राज्यात सर्वात मोठे आंदोलन उभे करणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असा शब्द सरकारने दिला होतो. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर राज्यात सर्वात मोठे मराठा आंदोलन उभे करुन राज्यातील मराठा आंदोलकंवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारला दिला आहे.
राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल गुन्ह्यापैकी ६० ते ६२ गुन्हे न्याय प्रविष्ट आहेत. त्याबाबत राज्यातील सरकारने अहवाल देऊन हे गुन्ह मागे घ्यायला हवेत. ८० गुन्हे असे आहेत त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवेत असे मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले आहेत. राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस जरी शब्दापासून बदलले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे कसे मागे घेत नाही मी बघतो. मी खंबीर आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत विभागीय समितीचा अहवाल अजून सरकारला गेलेला नाही. तो अहवाल गेला की सगळे गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
राज्यातील मराठा समाजाला उपसमितीच्या अध्यक्षाकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे. मनोज जरांगे यांनी विखे पाटलांवर ही टीका केली आहे. राज्यात जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झाली आहे, त्यांनी व सरकारने ही मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे आहे. त्यांनी नुसता दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. राज्यात मराठा समाजाला उपसमितीच्या अध्यक्षाकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती पहिली थांबली पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. मराठा उपसमितीतील लोकांना समज पाहिजे की राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.
राज्यातील मराठ्यांच्यामध्ये भांडणे लावण्यासाठी उप समिती बनवली नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी बनवला नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती बनवली नाही, तुमचा माज जिरवायला ही मराठी समिती बनवली नाही, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमची मस्ती तुमच्याकडे ठेवा. राज्यात मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची भांडणे लावायची बंद करा. यासाठी मराठा उपसमिती नसते. ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांचे काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचे काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचे काय? यासाठी मराठा उपसमिती असते, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आम्हाला वाटले होते, राज्यातील सरकारकडून १०० टक्के मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मात्र मराठा उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट सुरुवात केली आहे. सरकारने व उपसमितीने ही मराठ्यांच्यामध्ये भांडणे लावण्याची चळवळ सुरू केली आहे. त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का मिळत नाहीत? असा प्रश्न ही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्यात किती सरकारी योजना बंद पडल्या आहेत? राज्यात किती सरकारी योजना बंद पडल्यात हे बघायचे काम मराठा उप समितीच्या अध्यक्षाचे असताना ते मराठ्यांच्यामध्ये भांडणे लावत आहेत. राज्यातील सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर गंभीर विचार करत नाही? असेच चित्र राज्यात दिसत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





